coronavirus : डॉक्टरांच्या गटाने ममता बॅनर्जींना लिहिले खुले पत्र, केला गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 07:59 PM2020-04-23T19:59:29+5:302020-04-23T20:01:22+5:30

पश्चिम बंगाल सरकारकडून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

coronavirus: A group of doctors wrote an open letter to Mamata Banerjee, making serious allegations BKP | coronavirus : डॉक्टरांच्या गटाने ममता बॅनर्जींना लिहिले खुले पत्र, केला गंभीर आरोप

coronavirus : डॉक्टरांच्या गटाने ममता बॅनर्जींना लिहिले खुले पत्र, केला गंभीर आरोप

Next

कोलकाता - कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील  पश्चिम बंगाल सरकारकडून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अनिवासी डॉक्टरांच्या एका पथकाने ममता बॅनर्जी यांना खुले पत्र लिहिले आहे. पश्चिम बंगालमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची होत असलेली चुकीची नोंद आणि राज्यात होत असलेल्या कमी चाचण्यांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. 

बंगाली डॉक्टर, आरोग्य विषयक तज्ज्ञ आणि आरोग्य सेवक अशी स्वतःची ओळख करून देणाऱ्या या गटाने संपूर्ण देशात कोरोना चाचण्या पुरेशा संख्येत होत नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. गेल्या एक दीड आठवड्यापासून पश्चिम बंगालमध्ये कोरोनाबाबत वाढत असलेल्या चिंतेबाबत आम्ही निरीक्षण करत आहोत. बंगालमध्ये दररोज सरासरी केवळ 33.7 कोरोना चाचण्या होत आहेत. तर राष्ट्रीय सरासरी 156.9 आहे. मात्र  दरदिवशी सुमारे 1 हजार चाचण्या करण्याची क्षमता आहे, असे या डॉक्टरांनी रॉयटर्समधील वृत्ताच्य हवाल्याने   आपल्या पत्रात म्हटले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार बुधवारपर्यंत पश्चिम बंगालमध्ये केवळ 7 हजार 034 कोरोना चाचण्या झाल्या आहेत. याच्या तुलनेत आंध्र प्रदेशमध्ये 41 हजार 512, राजस्थानमध्ये 55 हजार 759 आणि तामिळनाडूमध्ये 53 हजार 045 कोरोना चाचण्या झाल्या आहेत. तर पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये बंगालपेक्षा कमी कोरोना चाचण्या झाल्या आहेत.  

दुसरीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात कमी प्रमाणात कोरोना चाचण्या होण्यासाठी आयसीएमआरला दोषी ठरवले आहे. सुरुवातीला आयसीएमआरकडून टेस्टिंग किट्स पुरवण्यात आल्या नाहीत. तर नंतर दिलेल्या किट्स सदोष होत्या असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

Web Title: coronavirus: A group of doctors wrote an open letter to Mamata Banerjee, making serious allegations BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.