Coronavirus: कोरोना रुग्णांवर उपचारासाठी गुजरातच्या कंपनीने बनवलेलं 'धमण १' व्हेंटिलेटर अयशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 09:39 AM2020-05-19T09:39:28+5:302020-05-19T09:43:34+5:30

अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या ज्येष्ठ डॉक्टरांनी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत म्हटलं आहे की, धमण -१ स्वदेशी व्हेंटिलेटर कोविड -१९ च्या रूग्णांवर प्रभावी सिद्ध होत नाही.

Coronavirus: Gujarat-made ventilator failed to treat coronavirus patients pnm | Coronavirus: कोरोना रुग्णांवर उपचारासाठी गुजरातच्या कंपनीने बनवलेलं 'धमण १' व्हेंटिलेटर अयशस्वी

Coronavirus: कोरोना रुग्णांवर उपचारासाठी गुजरातच्या कंपनीने बनवलेलं 'धमण १' व्हेंटिलेटर अयशस्वी

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरची मोठी मागणी आहेधमण -१ स्वदेशी व्हेंटिलेटर कोविड -१९ च्या रूग्णांवर प्रभावी सिद्ध होत नाही१०० हाई-एंड आयसीयू व्हेंटिलेटरची त्वरित मागणी

अहमदाबाद – देशव्यापी लॉकडाऊन असूनही कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यात सरकारला अपयश आलं आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या १ लाखांच्या वर पोहचली असून मृतांचा आकडा ३ हजारांपर्यंत पोहचला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ आहेत. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी गेल्या २ महिन्यापासून देशभर लॉकडाऊन सुरु आहे. ३१ मे पर्यंत लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु आहे.  

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरची मोठी मागणी आहे. अशावेळी गुजरातच्या राजकोट येथील एका कंपनीने बनविलेले व्हेंटिलेटर निकामी असल्याचं समोर आलं आहे. राजकोट येथील ज्योती सीएनसी कंपनीने कोविड -१९ च्या रूग्णांसाठी व्हेंटिलेटरचे विशेष डिझाइन केले होते. याचं नाव धमण -१ ठेवण्यात आले होती. त्याची किंमत एक लाख रुपये निश्चित करण्यात आली. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी स्वत: पत्रकार परिषदेत व्हेंटिलेटरविषयी माहिती दिली. त्यानंतर व्हेंटिलेटरच्या अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या. 

मात्र, आता अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या ज्येष्ठ डॉक्टरांनी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत म्हटलं आहे की, धमण -१ स्वदेशी व्हेंटिलेटर कोविड -१९ च्या रूग्णांवर प्रभावी सिद्ध होत नाही. त्यामुळे १०० हाई-एंड आयसीयू व्हेंटिलेटरची त्वरित मागणी देखील करण्यात आली आहे. राजकोटच्या कंपनीने केवळ १० दिवसात धमण व्हेंटिलेटर बनवण्याचा दावा केला होता. मुख्यमंत्र्यांनी स्वत: सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन याची  माहिती घेतली होती. त्याच वेळी, डॉक्टरांच्या १०० उच्च-अंत आयसीयू व्हेंटिलेटरच्या तात्काळ मागणीशी संबंधित लेटर माध्यमांच्या हाती लागलं. त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलचे वरिष्ठ डॉक्टर एमएम प्रभाकर म्हणाले की, ही मशीन प्रथमोपचारात कोरोना रूग्णांवर उपचार करण्यास मदत करते. म्हणजेच, ही मशीन व्हेंटिलेटर नसून केवळ श्वास घेण्यासारखे उपकरण आहे.

डॉक्टर म्हणाले की, अहमदाबादच्या कोविड हॉस्पिटलमध्ये येणा-या रूग्णांच्या गंभीर स्थितीमुळे त्यांना उच्च-अंत व्हेंटिलेटरवर ठेवणे फार महत्वाचे आहे. म्हणून उच्च-अंत व्हेंटिलेटरची मागणी केली गेली आहे. त्याचबरोबर या व्हेंटिलेटरसंदर्भात आरोग्य सचिव जयंती रवी सांगतात, या मशीनमध्ये अजून चार उपकरणे बसवण्यात आली नाहीत. सुरुवातीला या व्हेंटिलेटरमध्ये काही कमतरता भासल्यास प्रशिक्षणदेखील दिले होते. त्याचबरोबर धमण -१ बनविणार्‍या ज्योती सीएनसीचे मालक परकरामसिंग जडेजा यांचं म्हणणं आहे की ते पूर्ण व्हेंटिलेटर नाहीत, त्याबद्दल राज्य सरकारलाही कळविण्यात आले होते. व्हेंटिलेटरमध्ये अनेक पद्धती आहेत आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी आहेत. आम्ही धमण -३ बनवत आहोत जे संपूर्ण व्हेंटिलेटर आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढला; अमेरिकेच्या ‘या’ शहरातून श्रीमंतांनी पळ काढला

अन्य महत्त्वाच्या बातम्या

डोनाल्ड ट्रम्प यांची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरली; कोरोनावर लस मिळण्याची आशा वाढली!

X-ray मार्फत कोरोनाचं निदान होणार, फक्त 5 मिनिटांत रिझल्ट मिळणार?

राज्याचा आकडाही ३५ हजारांवर; आतापर्यंत ८,४३७ लोक कोरोनामुक्त

मोदी सरकारवर शिवसेनेचा घणाघात; राहुल गांधीवरील टीकेचाही घेतला समाचार, म्हणाले...

 

Web Title: Coronavirus: Gujarat-made ventilator failed to treat coronavirus patients pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.