CoronaVirus News: देशात कोरोना मृत्यूदरात गुजरात पहिला; जाणून घ्या महाराष्ट्राची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 02:40 AM2020-06-18T02:40:08+5:302020-06-18T06:54:22+5:30

भारतातील मृत्यू जगात सर्वात कमी; एका दिवसात महाराष्ट्रात १४०९ व दिल्लीत ४३७ जणांच्या मृत्यूची नोंद, तामिळनाडूचा मृत्यूदर सगळ्यात कमी १.०९ टक्का

CoronaVirus Gujarat ranks first in country in corona motility rate | CoronaVirus News: देशात कोरोना मृत्यूदरात गुजरात पहिला; जाणून घ्या महाराष्ट्राची स्थिती

CoronaVirus News: देशात कोरोना मृत्यूदरात गुजरात पहिला; जाणून घ्या महाराष्ट्राची स्थिती

Next

- हरीश गुप्ता 

नवी दिल्ली : भारतात कोरोना विषाणूच्या बाधेने अनेक मृत्यू होतीलही कदाचित. मंगळवारी ३८० मृत्यू होते, ते दुसऱ्या दिवशी २००३ वर गेले तरी काळजीचे कारण नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. राज्यांनी त्यांच्याकडील मृत्यूंची माहिती अद्ययावत केली. कारण राज्यांना केंद्र सरकार आणि न्यायालयांकडून कानपिचक्या मिळाल्या होत्या, त्या त्यांनी माहिती दडवून ठेवल्याबद्दल.

मात्र, अभ्यासातून धक्कादायक तपशील समोर आला- देशात गुजरातेत मृत्यूची सरासरी १७ जून रोजी सर्वाधिक ६.२३ टक्के, तर महाराष्ट्राची ४.८८, दिल्ली ४.११ टक्के. तामिळनाडूने लॉकडाऊन लागू केल्यामुळे त्याचा मृत्यूदर सगळ्यात कमी म्हणजे १.०९ टक्का आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि इतर राज्यांत मृत्यूदर हा सतत वाढता आहे. २० एप्रिल रोजी मृत्यूदर हा ४.५४ टक्क्यांवरून खाली आला. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन मे महिन्यात म्हणाले होते, भारतात कोरोना हा संसर्गजन्य नसल्यामुळे कोणीही घाबरून जायचे कारण नाही.

17 दिवसांतील मृत्यूंच्या संख्येच्या माहितीचे ‘लोकमत’ने खोलवर जाऊन विश्लेषण केले. त्यातून हे स्पष्ट झाले की, भारतातील मृत्यूदर आणि मृत्यूंची संख्या ही जागतिक सरासरीच्या खूप खाली आहे.

गेल्या १७ दिवसांतील संरचना (पॅटर्न) असे दाखवते की, ही टक्केवारी १७ जूनचा 3.36 टक्के हा एकमेव अपवाद वगळता तीन टक्क्यांच्या खाली राहिली आहे.

‘लोकमत’च्या इन हाऊस अभ्यासात (३१ मे ते १७ जून) भारतातील मृत्यू ३१ मे रोजी 2.83% (५१६४ मृत्यू) होता. तर त्याच दिवशी जागतिक सरासरी
5.99% (३,७२,०६७ मृत्यू) होती.

१५ जून रोजी भारतात मृत्यूची टक्केवारी काहीशी वाढून ती 2.86% (मृत्यू ९५२०) झाली, तर त्याच दिवशी जागतिक सरासरी 5.46% (मृत्यू ४,३३,६५५) होती.

भारतातील मृत्यूदर हा १७ जून रोजी ३.३६ टक्के, तर जागतिक सरासरी होती ५.४० टक्के.

मृत्यूच्या संख्येची माहिती ही केस फॅटालिटी रेट म्हणून ओळखली जाते. याचा अर्थ एकूण कोरोना रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत मृत्यू.

Web Title: CoronaVirus Gujarat ranks first in country in corona motility rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.