Coronavirus : दिल्लीत डॉक्टर, नर्ससह तब्बल 170 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 06:40 PM2020-04-27T18:40:42+5:302020-04-27T18:56:44+5:30
Coronavirus : देशात 28,380 कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या दररोज वाढत असल्याने ही आता चिंतेची बाब झाली आहे. तर 800 हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचं संकट ओळखून मोदींनी हा निर्णय घेतला. पहिल्या रुग्णापासून सुरुवात झालेल्या देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने 28,000 चा टप्पा पार केला आहे. सद्यस्थितीत देशात 28,380 कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या दररोज वाढत असल्याने ही आता चिंतेची बाब झाली आहे. तर 800 हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. रुग्णांवर वेळेत योग्य उपचार केले जावेत यासाठी वैद्यकिय क्षेत्रातील लोक खूप काम करत आहेत. मात्र याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
दिल्लीतील तब्बल 170 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. कोरोनाशी सामना करण्यासाठी डॉक्टरसह सर्वच क्षेत्रातील लोक प्रचंड काम करत आहेत. डॉक्टरही आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहून कोरोनाग्रस्तांची सेवा करत आहेत. मात्र असं असताना दिल्लीतील डॉक्टर, नर्ससह जवळपास 170 जणांच्या मेडिकल स्टाफला कोरोनाची लागण झाली आहे. दिल्लीच्या पटपडगंजमधील मॅक्स रुग्णालयात सर्वात जास्त करोनाबाधित आढळले आहेत. आरोग्य विभागाचे 33 कर्मचारी कोरोना संक्रमित असल्याची माहिती मिळत आहे.
Coronavirus : भारीच! फक्त चेहरा पाहून कोरोनाची माहिती मिळणार, 'हे' उपकरण फायदेशीर ठरणारhttps://t.co/hv9AsQGIHp#CoronaUpdatesInIndia#technology
— Lokmat (@MiLOKMAT) April 27, 2020
आरोग्य विभागाचे कर्मचारी कोरोनाग्रस्तांची देखरेख करत होते. तसेच दिल्लीतील बाबू जगजीवन राम रुग्णालय कोरोनाचं हॉटस्पॉट बनला आहे. येथील 44 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 100 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली असून त्याचा रिपोर्ट येणं बाकी आहे. तर दुसरीकडे दिल्लीच्या कॅन्सर रुग्णालयात 23 रुग्ण आढळले. त्यामुळे हे रुग्णालय काही दिवस बंद करावं लागलं आणि रुग्णांना इतर रुग्णालयात हलवण्यात आलं. रुग्णालयातील तीन कॅन्सर रुग्णांनाही कोरोनाची लागण झाली. यातील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Coronavirus : 'मी जिवंत आहे', डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या रुग्णाचा धक्कादायक Videohttps://t.co/BFCZn7zp2I#CoronaUpdatesInIndia#CoronaLockdown
— Lokmat (@MiLOKMAT) April 27, 2020
लेडी हार्डिंग आणि कलावती सरन रुग्णालयामध्ये ही अशीच स्थिती आहे. येथे 15, सफदरजंगमध्ये 5, महाराजा अग्रसेनमध्ये 5, एलएनजेपीमध्ये 6, हिंदूरावमध्ये 1 नर्स, मोहल्ला क्लिनिकचे 2 डॉक्टर आणि गंगाराम रुग्णालयाचे 3 कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आरएमएलमध्ये एक नर्स, एम्समध्ये एक डॉक्टर, तीन नर्स, ट्रॉमा सेंटरचे दोन कर्मचारी - एक तंत्रज्ञ सहीत आठ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वेगाने वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाच्या 1396 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर याच काळात 48 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 381 जणांनी कोरोनाला मात दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Video : धक्कादायक! VIP ताफ्यासाठी पोलिसांनी थांबवली रुग्णवाहिका
Coronavirus : भारीच! फक्त चेहरा पाहून कोरोनाची माहिती मिळणार, 'हे' उपकरण फायदेशीर ठरणार
Coronavirus : 'मी जिवंत आहे', डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या रुग्णाचा धक्कादायक Video
Coronavirus : लॉकडाऊनमध्ये WhatsApp ओपन न करता कोण, कधी ऑनलाईन आहे हे असं जाणून घ्या