Coronavirus: ना अ‍ॅम्ब्युलन्स, ना स्ट्रेचर; कोरोनाबाधित भावाला पाठीवर घेऊन रुग्णालयात आणले, पण प्राण नाही वाचले 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 02:46 PM2021-05-11T14:46:55+5:302021-05-11T14:48:46+5:30

Coronavirus in India: गोरखपूरमध्ये (Gorakhpur) बिकट परिस्थिती निर्माण झाली असून, येथील मेडिकल कॉलेजमध्ये रुग्णांना अ‍ॅम्ब्युलन्स आणि स्ट्रेचर मिळणेही दुरापास्त झाले आहेत.

Coronavirus: he carried corona positive brother on his back & go to the hospital, but his brother not survived | Coronavirus: ना अ‍ॅम्ब्युलन्स, ना स्ट्रेचर; कोरोनाबाधित भावाला पाठीवर घेऊन रुग्णालयात आणले, पण प्राण नाही वाचले 

Coronavirus: ना अ‍ॅम्ब्युलन्स, ना स्ट्रेचर; कोरोनाबाधित भावाला पाठीवर घेऊन रुग्णालयात आणले, पण प्राण नाही वाचले 

Next
ठळक मुद्देउत्तर प्रदेशमध्ये तर आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजले आहेतद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे निवासस्थान असलेल्या गोरखपूरमध्ये बिकट परिस्थिती अ‍ॅम्ब्युलन्स आणि स्ट्रेचर न मिळाल्याने एकजण आपल्या कोरोनाबाधित भावाला पाठीवर घेऊन रुग्णालयात आला

गोरखपूर - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत प्रचंड रुग्णवाढीमुळे देशातील आरोग्य यंत्रणा कोलमडून गेली आहे. (Coronavirus in India) उत्तर प्रदेशमध्ये तर आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजले आहेत. (Uttar Pradesh) खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे निवासस्थान असलेल्या गोरखपूरमध्ये (Gorakhpur) बिकट परिस्थिती निर्माण झाली असून, येथील मेडिकल कॉलेजमध्ये रुग्णांना अ‍ॅम्ब्युलन्स आणि स्ट्रेचर मिळणेही दुरापास्त झाले आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत एकजण आपल्या कोरोनाबाधित भावाला पाठीवर घेऊन रुग्णालयात घेऊन आला. मात्र दुर्दैवाने या रुग्णाने रुग्णालयाच्या काऊंटरवरच प्राण सोडले. (he carried corona positive brother on his back & go to the hospital, but his brother not survived)

प्रसारमाध्यमांमधील वृत्तानुसार कोरोनाबाधित भावाला घेऊन त्याचा भाऊ आणि काही सहकारी रुग्णालयात पोहोचले होते. मात्र या रुग्णाला अ‍ॅम्ब्युलन्स आणि स्ट्रेचर मिळाले नाही, असा आरोप होत आहे. दरम्यान, रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी रुग्णाला मृत घोषित केले. ही घटना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गृहक्षेत्रातील असल्याने त्यावरून टीका सुरू झाली आहे. 

दरम्यान, झाल्या प्रकाराबाबत बीआरडी मेडिकल कॉलेजच्या प्राचार्यांना विचारले असता आपल्याला या घटनेबाबत काही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच काही लोक जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा त्यांनी केला. तसेच रुग्णालयामध्ये स्ट्रेचर हे रोडवर नाहीत तर वॉर्डमध्ये असतात असेही त्यांनी सांगितले. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोरदार फटका उत्तर प्रदेशला बसला आहे. मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. कालही उत्तर प्रदेशमध्ये जवळपास २१ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली होती. 

Web Title: Coronavirus: he carried corona positive brother on his back & go to the hospital, but his brother not survived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.