Coronavirus: ‘आरोग्य सेतू’ असुरक्षित?; फ्रेंच सायबर सिक्युरिटी विश्लेषकाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 01:32 AM2020-05-09T01:32:57+5:302020-05-09T01:33:30+5:30

डेटा हॅक करणे शक्य, पुरावे देण्याचे मात्र टाळले

Coronavirus: ‘Health Bridge’ Insecure ?; French cybersecurity analyst claims | Coronavirus: ‘आरोग्य सेतू’ असुरक्षित?; फ्रेंच सायबर सिक्युरिटी विश्लेषकाचा दावा

Coronavirus: ‘आरोग्य सेतू’ असुरक्षित?; फ्रेंच सायबर सिक्युरिटी विश्लेषकाचा दावा

Next

नवी दिल्ली : आपल्या भागातील ‘कोविड-१९’च्या रुग्णांसंदर्भात आणि सुरक्षेसंदर्भात माहिती देण्यासाठी केंद्र सरकारने तयार केलेले आरोग्य सेतू हे अ‍ॅप असुरक्षित असून त्यातील माहिती हॅक होऊ शकते, असा दावा फ्रान्समधील एका सायबर सिक्युरिटी विश्लेषकाने केला. यामुळे साहजिकच खळबळ उडाली आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने मात्र हा दावा फेटाळून लावला आहे.

रॉबर्ट बाप्टिस्ट नामक हा विश्लेषक टिष्ट्वटरवर इलियट एल्डरसन या वेगळ्या नावाने सक्रिय आहे. त्याने केलेल्या दाव्यानुसार, आरोग्य सेतू अ‍ॅपच्या डेटाचा वापर करून कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तीची माहिती मिळवता येणे शक्य आहे. बाधित आणि इतर लोकांची माहिती अटॅकर्स सहज मिळवू शकतात.

‘‘पंतप्रधान कार्यालयातील ५ जणांना अस्वस्थ वाटत आहे... भारतीय सेनेच्या मुख्यालयातील दोघे अस्वस्थ... संसदेतील एक जण बाधित...’’ अशा आशयाचे बाप्टिस्ट याने बुधवारी (दि. ६) केले होते. त्याच सोशल मीडियात चर्चा रंगली आहे. एखाद्या ठिकाणावरील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती या अ‍ॅपच्या माध्यमातून मिळवता येऊ शकते, असा दावा करणाऱ्या बाप्टिस्ट याने यासंदर्भात अद्याप तरी काहीही पुरावा दिलेला नाही. मात्र, आरोग्य सेतू या अ‍ॅपसंदर्भातील सुरक्षा त्रुटींबाबत लवकरच सविस्तर माहिती देणार असल्याचे त्याने सांगितले आहे.

डेटा सुरक्षित; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
रॉबर्ट बाप्टिस्ट याने केलेला दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने फेटाळून लावला आहे. आरोग्य सेतू हे अ‍ॅप वापरणाºया सर्व युझर्सचा डेटा पूर्णपणे सुरक्षित आहे. फ्रान्सच्या व्यक्तीने केलेल्या दाव्याला काहीही आधार नाही. कोणत्याही युझरची माहिती असुरक्षित असल्याचे पुढे आलेले नाही, ’ असे आरोग्य सेतू अ‍ॅपतर्फे जारी अधिकृत स्पष्टीकरणात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Coronavirus: ‘Health Bridge’ Insecure ?; French cybersecurity analyst claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.