कोरोनाचे सावट; स्वातंत्र्य दिन सोहळा यंदा असेल ‘आटोपशीर’!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 06:17 AM2020-08-14T06:17:28+5:302020-08-14T06:40:19+5:30
मोदींच्या भाषणात आत्मनिर्भर भारत, राष्ट्रीय हेल्थ कार्ड, कोरोनापासून स्वातंत्र्य यावर असेल भर
- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : अयोध्येतील राममंदिर भूमिपूजन सोहळ्या सहभागी झालेले महंत नृत्यगोपालदास यांना कोरोनाची लागण झाल्याचे सावट दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यावरही पडले आहे. पाच ऑगस्ट रोजी महंत नृत्यगोपालदास यांच्या थेट संपर्कात पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. ही स्थिती लक्षात घेऊन स्वातंत्र्यदिन कार्यक्रमाच्या पूर्वतयारीला लागलेल्या सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. स्वातंत्र्यदिनाचा सोहळ््याचे स्वरुप यंदा आटोपशीर असेल.
यंदाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याची दोन प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. बिगरकाँग्रेसी पंतप्रधानांमध्ये अटलबिहारी वाजपेयी सर्वाधिक काळ त्या पदावर विराजमान होते. सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी यंदाच्या वर्षी तो विक्रम मोडणार आहेत. तसेच या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आत्मनिर्भर भारत व राष्ट्रीय हेल्थ कार्ड या दोन गोष्टींवर आपल्या भाषणात भर देणार असल्याचे कळते.
संचलनातील सैनिकांसाठी खास व्यवस्था
स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याच्या पूर्वतयारीमध्ये आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (एएसआय), दिल्ली जल महामंडळ, दिल्ली पोलीस, केंद्र तसेच राज्य सरकार आदी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सहभागी असतात. त्याशिवाय भूदल, नौदल, वायूदलाचे जवान पंतप्रधानांच्या जवळपास असतात. सूत्रांनी सांगितले की, तीनही सेनादलांचे जे जवान स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात सहभागी होणार आहेत, त्यांना काही दिवसांपूवीर्पासून क्वारंटाइन करण्यात आले आहे. या जवानांसाठी जेवण बनविणारे, त्यांच्या गाड्यांचे चालक, सहाय्यक तसेच त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी राहाण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या संचलनात सहभागी होणाºया जवानांना कोणत्याही प्रकारे कोरोनाचा संसर्ग होता कामा नये, तसेच त्यांच्यामुळे पंतप्रधान व अन्य मान्यवर व्यक्तींनाही बाधा होऊ नये म्हणून अतिशय काळजी घेण्यात येत आहे. तसेच या जवानांसाठी असलेल्या गाड्याही सॅनिटाइझ केल्या जात आहेत.
कोरोना साथीमुळे स्वातंत्र्यदिन कार्यक्रमाच्या आयोजनात काही बदल करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून जवळच्या अंतरावर बसणाऱ्या व्हीव्हीआयपींची आसनव्यवस्था यावर्षी मुख्य व्यासपीठाला लागून असलेल्या उद्यानामध्ये करण्यात आली आहे. फिजिकल डिस्टन्सिंग नीट राखले याची काळजी घेऊनच ही व्यवस्था करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून प्रत्येक व्यक्ती १० फुट अंतर दूर राहिल अशाच पद्धतीने स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे नियोजन केले जाणार आहे. दरवर्षी या सोहळ्या एक हजार जणांना निमंत्रण देण्यात येते. पण यंदा दीड हजार कोरोना योद्धे उपस्थित राहाणार आहेत.
राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमाच्या वेळेत कपात
स्वातंत्र्यदिन सोहळ्यानंतर संध्याकाळी राष्ट्रपती भवनामध्ये अॅटहोम हा कार्यक्रम आयोजिण्यात येतो. पण यंदा त्यावरही कोरोनाचे सावट आहे. तिथे १५०० ऐवजी फक्त १०० पाहुण्यांनाच बोलाविण्यात आले आहे. अडीच तासाच्या या कार्यक्रमाची वेळ आता दीड तासांवर आणण्यात आली आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात १० प्रमुख मंत्री, १० प्रमुख देशांचे राजदूत व सरन्यायाधीश, दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती तसेच काही आणखी न्यायाधीश सहभागी होतील. तसेच वयोवृद्धांना कोरोना संसगार्पासून मोठा धोका असल्याने यंदा स्वातंत्र्यसैनिकांना आमंत्रण देण्यात आलेले नाही. तसेच मंत्रिमंडळ सचिवांसहित आणखी काही सनदी अधिकारी यावेळी उपस्थित राहातील. पण त्यांच्याबरोबर त्यांचे कुटुंबीय असणार नाहीत.
राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमाच्या वेळेत कपात
स्वातंत्र्यदिन सोहळ्यानंतर संध्याकाळी राष्ट्रपती भवनामध्ये अॅटहोम हा कार्यक्रम आयोजिण्यात येतो. पण यंदा त्यावरही कोरोनाचे सावट आहे. तिथे फक्त १०० पाहुण्यांनाच बोलाविण्यात आले आहे. या कार्यक्रमाची वेळ आता दीड तासांवर आणण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात १० प्रमुख मंत्री, १० प्रमुख देशांचे राजदूत व सरन्यायाधीश, दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती तसेच काही आणखी न्यायाधीश सहभागी होतील.
तसेच वयोवृद्धांना कोरोना संसगार्पासून मोठा धोका असल्याने यंदा स्वातंत्र्यसैनिकांना आमंत्रण देण्यात आलेले नाही. तसेच मंत्रिमंडळ सचिवांसहित आणखी काही सनदी अधिकारी यावेळी उपस्थित राहातील. पण त्यांच्याबरोबर त्यांचे कुटुंबीय असणार नाहीत.
संचलनातील सैनिकांसाठी खास व्यवस्था
स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याच्या पूर्वतयारीमध्ये आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (एएसआय), दिल्ली जल महामंडळ, दिल्ली पोलीस, केंद्र तसेच राज्य सरकार आदी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सहभागी असतात. त्याशिवाय भूदल, नौदल, वायूदलाचे जवान पंतप्रधानांच्या जवळपास असतात.
ते सर्व जवान क्वारंटाइन
तीनही सेनादलांचे जे जवान सोहळ्यात सहभागी होणार आहेत, त्यांना काही दिवसांपूर्वीपासून क्वारंटाइन करण्यात आले आहे. या जवानांसाठी जेवण बनविणारे, त्यांच्या गाड्यांचे चालक, सहाय्यक तसेच त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी राहाण्याची स्वतंत्र व्यवस्था केली आहे.
या जवानांना कोणत्याही प्रकारे कोरोनाचा संसर्ग होता कामा नये, तसेच त्यांच्यामुळे पंतप्रधान व अन्य मान्यवर व्यक्तींनाही बाधा होऊ नये म्हणून काळजी घेण्यात येत आहे. तसेच या जवानांसाठी असलेल्या गाड्याही सॅनिटाइझ केल्या जात आहेत.