व्हॉट्सअॅप स्टिकर शेअर केल्यानं थांबणार कोरोना! जाणून घ्या, भारत सरकारच्या या अनोख्या उपक्रमाचं रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 11:45 PM2021-04-24T23:45:56+5:302021-04-24T23:46:40+5:30
मंत्रालयाने ट्विटरवरून लोकांना एक व्हॉट्सअॅप स्टिकर वापरण्याची आणि ते आपले मित्र तथा कुटुंबिय, यांच्यासोबत शेअर करण्याची विनती केली आहे.
नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. पीडित ऑक्सिजन सिलेंडर आणि रुग्णालयात बेड मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करताना दिसत आहेत. अशी परिस्थिती उद्भवल्याने देशात अनेक ठिकाणी संपूर्ण लॉकडाउन करण्यात आले आहे. मास्क लावणे आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे अनिवार्य झाले आहे. ही संपूर्ण परिस्थिती पाहता, घराबाहेर पडू नये, म्हणून नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्रालयाने (MoH&FW) एका नव्या आणि इनोव्हेटिव्ह पद्धतीचा अवलंब करायचे ठरविले आहे. तर जाणून घेऊया नेमके काय आहे, हे संपूर्ण प्रकरण... (CoronaVirus Heres why health ministry wants you to use this sticker pack on whatsapp know details)
मंत्रालयाने ट्विटरवरून लोकांना एक व्हॉट्सअॅप स्टिकर वापरण्याची आणि ते आपले मित्र तथा कुटुंबिय, यांच्यासोबत शेअर करण्याची विनती केली आहे. या मागचा हेतू, केवळ कोरोनापासून सुरक्षित राहण्याच्या योग्य पद्धती वापरण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे, असा आहे.
धक्कादायक! दारू मिळाली नाही म्हणून सॅनिटायझर पिलं, 7 जणांचा मृत्यू
ट्विटरवर स्टिकर पॅक डाउनलोड करण्यासंदर्भातील लिंक -
ट्विटमध्ये मंत्रालयाने म्हटले आहे, की COVID संदर्भातील आवश्यक गोष्टींचा वापर करून आपण संक्रमणापासून सुरक्षित राहू शकता. मंत्रालयाने लोकांना हे स्टिकर आपले मित्र, तथा नातलगांसोबत जास्तीत जास्त शेअर करण्याचे आवाहन केले आहे. लोकांच्या सुविधेसाठी या ट्विटमध्ये स्टिकर पॅकची एक लिंकदेखील दिली आहे. या माध्यमाने हे स्टिकर पॅक व्हॅट्सअॅपसाठी डाउनलोड केले जाऊ शकते.
#Unite2FightCorona
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) April 23, 2021
Please share this sticker pack widely with your friends and families. Adopting COVID Appropriate Behaviour can save you from contracting COVID-19.
https://t.co/erlLvul9MEpic.twitter.com/asXHo6HJGy
अशी आहे राज्याची स्थिती -
सध्या देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज ३ लाखांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत सध्या आरोग्य व्यवस्थेवरही ताण पडत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रासह काही राज्यांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कठोर निर्बंध लावले आहेत. गेल्या चोवीस तासांत राज्यात ६७,१६० नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर तब्बल ६३,८१८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर दुसरीकडे मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब म्हणजे गेल्या चोवीस तासांत कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे.
Corona Vaccine : कोरोना लस घेतल्यानंतर महिलेच्या अंगावर आले रक्ताचे फोड, पाय कापावा लागण्याची सतावतेय भीती
गेल्या चोवीस तासांत राज्यात ६७,१६० नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ६७६ रुग्णांना कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये तब्बल ६३,८१८ जणांनी कोरोनावर मात केली. राज्यात सध्या ६,९४,४८० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत राज्यात एकूण ३४,६८,६१० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ६३९२८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. दुसरीकडे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ८२.०२ टक्क्यांवर पोहोचला आहे.