coronavirus: भारतात मान्सूनमुळे कोरोना वाढण्याचा धोका जास्त; मास्क हेच एकमेव संरक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 03:55 AM2020-07-07T03:55:53+5:302020-07-07T07:54:08+5:30
कोरोना विषाणू संक्रमण हवेत ड्रॉपलेट्समुळे पसरतो. हे ड्रॉपलेट्स उन्हात लवकर वाळतात आणि वातावरण थंड असते तेव्हा त्यांना वाळण्यास वेळ लागतो.
- एस. के. गुप्ता
नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेचा (डब्ल्यूएचओ) प्रदीर्घ काळपासून असा समज आहे की, कोरोना विषाणूचा फैलाव ‘मोठ्या ड्रॉपलेट्स’ने होतो. संघटनेचे म्हणणे आहे की, आजारी व्यक्तीच्या शिंकण्यातून हा विषाणू लगेच जमिनीवर थुंकीतून पडतो. या परिस्थितीत तो हवेत असण्याची शंका नसते. नुकतेच ३२ देशांच्या २३९ शास्त्रज्ञांनी डब्ल्यूएचओला खुले पत्र लिहून म्हटले की, हवेत विषाणू असण्याबद्दल तुमच्या शिफारशींमध्ये संशोधन करावे. याबाबत आयआयटीत (दिल्ली) सिस्मोलॉजी विभागाचे प्रोफेसर आणि नुकतेच कोविड डिटेक्शन कीटच्या कोअर टीमचे माजी सदस्य प्रो. बिश्वजित कुंडू यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले की, शास्त्रज्ञांचा तर्क अजिबात योग्य नाही; परंतु जर विषाणू हवेतही पसरतो आणि छोटे ड्रॉपलेट्स कोरोनाचे मुख्य संवाहक बनत असतील तर एकमात्र बचाव मास्क वापरणे आहे.
या शास्त्रज्ञांनी पत्रात व्यक्त केलेली चिंता हवेत असलेल्या छोट्या ड्रापलेट्सबद्दलही आहे. प्रो. कुंडू ूूम्हणाले की, ‘‘कोरोना विषाणू संक्रमण हवेत ड्रॉपलेट्समुळे पसरतो. हे ड्रॉपलेट्स उन्हात लवकर वाळतात आणि वातावरण थंड असते तेव्हा त्यांना वाळण्यास वेळ लागतो. कोरोना काळात लोकांना सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यास एवढ्यासाठी सांगितले जाते की, जर समोरच्या व्यक्तीने मास्क लावलेला नसेल व तो बाधित असेल तेव्हा तुम्ही त्याच्या जवळ उभे आहात अशा परिस्थितीत ती व्यक्ती शिंकली किंवा खोकली तर त्यातून कोरोना पसरवणारे ड्रॉपलेट्स जवळपास सहा फुटांपर्यंत जाऊ शकतात. तापमानात उष्णता असेल तर हेच ड्रापलेट्स काहीच वेळेत वाळून जातात.