CoronaVirus: देशात नव्या रुग्णांची दोन महिन्यांतील सर्वाधिक संख्या; केरळसह महाराष्ट्रात सर्वांत जास्त रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 07:27 AM2021-09-03T07:27:50+5:302021-09-03T07:27:59+5:30

देशात १ जुलै रोजी कोरोनाचे ४८,७८६ नवे रुग्ण आढळून आले होते.

CoronaVirus: highest number of new patients in the country in two months; Maharashtra has the highest number of patients including Kerala pdc | CoronaVirus: देशात नव्या रुग्णांची दोन महिन्यांतील सर्वाधिक संख्या; केरळसह महाराष्ट्रात सर्वांत जास्त रुग्ण

CoronaVirus: देशात नव्या रुग्णांची दोन महिन्यांतील सर्वाधिक संख्या; केरळसह महाराष्ट्रात सर्वांत जास्त रुग्ण

Next

नवी दिल्ली : देशात गेल्या चोवीस तासांमध्ये कोरोनाचे ४७ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या दोन महिन्यांतील ही सर्वाधिक संख्या आहे. कोरोना संसर्गामुळे आणखी ५०९ जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये ३२ हजार नवे रुग्ण सापडले असून, याबाबत ते राज्य देशात आघाडीवर आहे.

देशात १ जुलै रोजी कोरोनाचे ४८,७८६ नवे रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर दोन महिन्यांनी कोरोनाचे सर्वाधिक नवे रुग्ण सापडले. 
देशात कोरोना रुग्णांचा आकडा आता ३ कोटी २८ लाख ५७ हजार ९३७ इतका झाला आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये केरळमध्ये ३२,८०३ नवे रुग्ण सापडले. त्यापाठोपाठ महाराष्ट्र, मिझोराम, तामिळनाडू, आंध्र प्रदेशमध्ये सर्वांत जास्त नवे रुग्ण आढळले. 

जगात २१ कोटी रुग्ण-

जगभरात २१ कोटी ९३ लाख कोरोना रुग्ण आहेत. त्यापैकी १९ कोटी ६१ लाख लोक बरे झाले. या संसर्गाने ४५ लाख ४६ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ कोटी ८६ लाख रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यातील १ लाख ४ हजार जणांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे.

वैज्ञानिक तथ्यांच्या आधारावर बूस्टर डोसचा निर्णय- पॉल

कोरोनाला रोखण्यासाठी बूस्टर डोस द्यायचा की नाही यावर जगभर विचारमंथन सुरू आहे. जो काही निर्णय होईल तो वैज्ञानिक तथ्यांच्या आधारावर घेतला जाईल, असे नीती आयोगाचे सदस्य  व्ही. के. पॉल गुरुवारी म्हणाले.  जागतिक आरोग्य संघटनेने या बूस्टर डोसला मंजुरी दिलेली नाही. देशातही नॅशनल टेक्निकल ॲडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशनचे या विषयाकडे लक्ष आहे.

Web Title: CoronaVirus: highest number of new patients in the country in two months; Maharashtra has the highest number of patients including Kerala pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.