CoronaVirus : कोरोना रुग्ण वाढीचा सर्वाधिक धोका लहान मुलांना, आरोग्य मंत्रालयाने दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 10:59 AM2021-07-17T10:59:49+5:302021-07-17T11:00:27+5:30

CoronaVirus : आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, लहान मुलांना कोरोना व्हायरसपासून वाचवण्यासाठी योग्य नियोजन करण्याची गरज आहे.

CoronaVirus: The highest risk of corona patient growth in young children, the Ministry of Health warned | CoronaVirus : कोरोना रुग्ण वाढीचा सर्वाधिक धोका लहान मुलांना, आरोग्य मंत्रालयाने दिला इशारा

CoronaVirus : कोरोना रुग्ण वाढीचा सर्वाधिक धोका लहान मुलांना, आरोग्य मंत्रालयाने दिला इशारा

googlenewsNext

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये वाढत्या कोरोना प्रकरणामुळे चिंता व्यक्त केली आहे. तसेच, लहान मुलांना कोरोना व्हायरसची लागण होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे. देशातल्या कोरोनाच्या परिस्थितीवर शुक्रवारी (दि.१६) आरोग्य मंत्रालयाची पत्रकार परिषद पार पडली. (children may also be at covid-19 risk proper planning needed to protect them health ministry)

या पत्रकार परिषदेत आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, लहान मुलांना कोरोना व्हायरसपासून वाचवण्यासाठी योग्य नियोजन करण्याची गरज आहे. याचबरोबर, अजूनही 10 टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हिटी रेट नोंदवणाऱ्या देशातील जिल्ह्यांविषयी आरोग्य मंत्रालयाने सावधगिरी व्यक्त केली असून कोरोना व्हायरस अजून संपला नसल्याचे म्हटले आहे.

मास्कच्या वापरात लक्षणीय घट
गेल्या काही दिवसांत मास्क वापरण्यात लक्षणीय घट झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. काही ठिकाणी निर्बंधात शिथिलता आल्यानंतर मास्कच्या वापरामध्ये लक्षणीय घट झाली असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. आपण मास्क वापरणे ही गोष्ट सामान्य प्रक्रियेत समाविष्ठ केली पाहिजे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव म्हणाले.

लव अग्रवाल म्हणाले की, देशात दुसरी लाट अद्याप संपलेली नाही आणि लोकांनी कोरोना नियमांचे योग्य पालन करावे. तसेच, कोरोना व्हायरसच्या तिसर्‍या लाटेची तयारी करण्यासाठी आरोग्यच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे आवाहन त्यांनी राज्य सरकारांना केले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, ओडिशा, महाराष्ट्र आणि केरळच्या मुख्यमंत्र्यांसमवेत देशातील सहा राज्यांमधील कोरोना परिस्थितीवर बैठक घेतली. यावेळी, गेल्या काही दिवसांत वरील 6 राज्यांत जवळपास 80 टक्के नवीन कोरोनाची प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी राज्य सरकारांना कृतीशील पावले उचलण्यास पंतप्रधानांनी सांगितले.

मोदी सरकारकडून लसींची मोठी ऑर्डर
भारतात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला चांगला वेग आला आहे. केंद्र सरकार लसीकरणासाठी कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसींचे तब्बल 14 हजार 505 कोटी रुपयांचे जवळपास 66 कोटी डोस खरेदी करणार आहे. यामुळे निश्चित देशातील कोरोना लसीकरणाचा वेग वाढेल. तसेच, ही आतापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर असल्याचे म्हटले जात आहे. लवकरच देशाला लसींचे 66 कोटी डोस उपलब्ध होणार आहेत. या डोसमुळे वर्षाअखेरीपर्यंत देशातल्या 18 वर्षांहून अधिक वय असलेल्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण होण्यास मदत होणार आहे. आत्तापर्यंत एकूण 39 कोटी 53 लाख 43 हजार 767 नागरिकांनी करोना प्रतिबंधक लस टोचून घेतली आहे.


 

या' महिन्याच्या अखेरीस येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट, ICMR चा इशारा
भारतात कोरोना संसर्गाची दुसरी लाट संपताच तिसऱ्या लाटेचा धोका वाढू लागला आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (ICMR) डिव्हिजन ऑफ एपिडेमियोलॉजी अँड कम्युनिकेबल डिजीजचे प्रमुख डॉक्टर समीरन पांडा यांनी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस कोरोना व्हायरसची तिसरी लहर येण्याची भीती व्यक्त केली आहे. डॉक्टर समीरन पांडा यांनी एका वृत्तवाहिनीशी काल संवाद साधला. यावेळी कोरोना संक्रमणाची तिसरी लाट दुसर्‍या लाटेइतकी धोकादायक ठरणार नाही. मात्र, पुन्हा एकदा संपूर्ण देश कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या नियंत्रणाखाली येईल, असे ते म्हणाले.   

Web Title: CoronaVirus: The highest risk of corona patient growth in young children, the Ministry of Health warned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.