Coronavirus: हिंदू महासभा डोनाल्ड ट्रम्प यांना गोमूत्र पाठवणार; कोरोना बरा होण्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 11:16 AM2020-03-15T11:16:43+5:302020-03-15T11:22:51+5:30
गोमूत्र प्यायल्याने कोरोना दूर होतो, असा दावा हिंदू महासभेने केला. या पार्टीचा व्हिडीओ बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी ट्विट केलाय.
नवी दिल्ली: कोरोनाने जगभरात थैमान घातलंय. कोरोना बाधितांची संख्या दीड लाखांपेक्षा जास्त असून आतापर्यंत जवळपास पाच हजार आठशे लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय हिंदू महासभेने गोमूत्र पार्टीचं आयोजन केलं होतं. गोमूत्र प्यायल्याने कोरोना दूर होतो, असा दावा हिंदू महासभेने केला. या पार्टीचा व्हिडीओ बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी ट्विट केलाय. यामध्ये हिंदू महासभेचे सदस्य गोमूत्र प्राशन केल्यास कोरोनाची लागण होत नसल्याचा दावा करताना दिसताहेत.
विमानतळावर दारूबंदी करण्यात यावी आणि त्याजागी गोमूत्र ठेवण्यात यावं, अशी मागणी सरकारकडे करणार असल्याचं हिंदू महासभेच्या गोमूत्र पार्टीला जमलेल्या काहींनी सांगितलं. आम्ही ट्रम्पजी यांनाही गोमूत्र पाठवणार आहोत, अशी माहिती एकानं दिली. आम्ही पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहोत. ते तर स्वतः गोमूत्र पितात, असा दावाही त्यांनी केला. अनुराग कश्यप यांनी 'अच्छे दिन' या शीर्षकासह हा व्हिडीओ शेअर केलाय. कश्यप यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर आतापर्यंत शेकडो कमेंट्स आल्या आहेत.
Achche din 👇🏼 https://t.co/iUZLEwsOW4
— Anurag Kashyap (@anuragkashyap72) March 14, 2020
जगभरात आतापर्यंत 1 लाख 56 हजार 396 जणांना कोरोनाची बाधा झाली असून 5 हजार 833 जणांनी जीव गमावलाय. तर 73 हजार 968 जणांवर यशस्वी उपचार झाले आहेत. भारतात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झालाय. सध्या देशात कोरोनाचे 96 रुग्ण असून 4 जण बरे झाले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 30 पेक्षा जास्त असून सर्वाधिक रुग्ण पुण्यात आहेत.
Coronavirus : शहरांमधील शाळा, कॉलेज, मॉल्स, कोचिंग क्लास ३१ मार्चपर्यंत बंद, प्रतिबंधासाठी कडक उपाय
Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले पाच नवे कोरोनाबाधित, राज्यातील रुग्णांची संख्या 31 वर
Coronavirus : चीनहून परतलेली विद्यार्थिनी थेट पोहोचली रुग्णालयात; डॉक्टरांनी खुर्ची सोडून ठोकली धूम
Coronavirus : देशात 100हून अधिक कोरोना संक्रमित रुग्ण; भारतानं पाच देशांच्या सीमा केल्या बंद