Coronavirus: कोरोनाचं भयावह चित्र, पंधरवड्यात एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू, ५ जणांचं एकाच दिवशी तेरावं 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 11:33 AM2021-06-01T11:33:38+5:302021-06-01T11:34:18+5:30

Coronavirus in India: देशाला हादरवणारी कोरोनाची दुसरी लाट आता बऱ्यापैकी ओसरली असली तरी या लाटेने अनेक कुटुंबांना दिलेल्या वेदनांच्या हृदयद्रावक कहाण्या आता समोर येत आहेत. 

Coronavirus: Horrible picture of coronavirus, 8 members of the same family die in fortnight, 5 members die on the same day in Uttar Pradesh | Coronavirus: कोरोनाचं भयावह चित्र, पंधरवड्यात एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू, ५ जणांचं एकाच दिवशी तेरावं 

Coronavirus: कोरोनाचं भयावह चित्र, पंधरवड्यात एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू, ५ जणांचं एकाच दिवशी तेरावं 

Next

लखनौ - देशाला हादरवणारी कोरोनाची दुसरी लाट आता बऱ्यापैकी ओसरली असली तरी या लाटेने अनेक कुटुंबांना दिलेल्या वेदनांच्या हृदयद्रावक कहाण्या आता समोर येत आहेत.  (Coronavirus in India) अशीच एक दु:खद घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. येथील एका कुटुंबावर कुटुंबातील पाच सदस्यांचं तेरावं एकाच दिवशी घालण्याचा दु:खद प्रसंग ओढवला. कुठल्याही कुटुंबावर अशी वेळ क्वचितच आली असेल, त्यातही ज्या पाच जणांचं तेरावं करण्यात आलं त्यामध्ये चार जण सख्खे भाऊ होते. (Horrible picture of coronavirus, 8 members of the same family die in 20 days in Uttar Pradesh)

लखनौमधील ओमकार यादव यांच्या कुटुंबाला या दु:खद प्रसंगाला सामोरे जावे लागले. लखनौजवळ असलेल्या इमलिया पूर्वा गावात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले होते. या लाटेत यादव यांचे संपूर्ण कुटुंब उदध्वस्त झाले. हसत्या खेळत्या कुटुंबातील चार महिला विधवा झाला. कुटुंबातील एकूण आठ जणांच्या अवघ्या २० दिवसांच्या काळात मृत्यू झाला. त्यापैकी ७ जणांचा कोरोनाने तर एका ज्येष्ठ व्यक्तीचा भीतीने हृदयगती बंद पडून मृत्यू झाला. 

मिळालेल्या माहितीनुसार २५ एप्रिलपासून १५ मेपर्यंतच्या काळात एकाच कुटुंबातील ८ जणांचा कोरोनाचा संसर्ग होऊन मृत्यू झाला. याबाबत गावाचे सरपंच मेवाराम यांनी सांगितसे की, एवढी भयावह घटना घडल्यानंतरही सरकारकडून कुठल्याही सॅनिटायझेशनची व्यवस्था करण्यात आली नाही. तसेच कोरोनाची चाचणी करण्याचीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. 
  
कोरोनाचा संसर्ग होऊन कुटुंबातील आठ सदस्यांना गमावल्यानंतर आता या कुटुंबाला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे सरकारकडून अद्यापपर्यंत सॅनिटायझेशन आणि कुटुंबीयांच्या चाचण्यांची व्यवस्था झाली नसल्याचा आरोप केला जात आहे. गावच्या सरपंचांनी केलेल्या दाव्यानुसार येथे सुमारे ५० जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी ५ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र प्रशासन अद्याप येथे पोहोचू शकलेले नाही.  

Web Title: Coronavirus: Horrible picture of coronavirus, 8 members of the same family die in fortnight, 5 members die on the same day in Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.