Coronavirus: मुंबईसह इतर महानगरांमध्ये किती लोकांच्या शरीरात अँटिबॉडी विकसित? समोर आली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 09:46 AM2021-08-03T09:46:00+5:302021-08-03T09:46:49+5:30

Coronavirus: कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी किती प्रमाणात अँटिबॉडी विकसित झाल्या आहेत, याचा अंदाज सिरो सर्वेक्षणात, रक्तचाचणी मध्ये येतो का? याकडे खासदार अरविंद सावंत यांनी लक्ष वेधले होते.

Coronavirus: How many people in Mumbai and other metros develop antibodies? Information came to the fore | Coronavirus: मुंबईसह इतर महानगरांमध्ये किती लोकांच्या शरीरात अँटिबॉडी विकसित? समोर आली माहिती

Coronavirus: मुंबईसह इतर महानगरांमध्ये किती लोकांच्या शरीरात अँटिबॉडी विकसित? समोर आली माहिती

Next

- विकास झाडे
 नवी दिल्ली : दिल्ली, मुंबई, पुणे, चेन्नई, अहमदाबाद आणि हैदराबादसारख्या महानगरांमध्ये वेगवेगळ्या वेळी १७.६ टक्के ते ५६ टक्के दरम्यान सिरोची व्यापकता आढळली आहे, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी लोकसभेतसांगितली. (How many people in Mumbai and other metros develop antibodies? Information came to the fore) 

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी किती प्रमाणात अँटिबॉडी विकसित झाल्या आहेत, याचा अंदाज सिरो सर्वेक्षणात, रक्तचाचणी मध्ये येतो का? याकडे खासदार अरविंद सावंत यांनी लक्ष वेधले होते.  डॉ. पवार म्हणाल्या, पहिल्या तीन सिरो सर्वेक्षणादरम्यान निवडलेल्या २० राज्यांच्या ७० जिल्ह्यांमध्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात हे सर्वेक्षण करण्यात आले. अनेक राज्ये आणि शहरांनी सिरो सर्वेक्षण केले आहे. आयसीएमआरने कोरोना व्हायरस अँटिबॉडी प्रसार निश्चित करण्यासाठी कोविड राष्ट्रीय सिरो सर्वेक्षणांचे चार टप्पे पूर्ण केले आहेत.

Web Title: Coronavirus: How many people in Mumbai and other metros develop antibodies? Information came to the fore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.