coronavirus: कोविड-१९ वरील प्रतिबंधक लस शोधण्यासाठी आयसीएमआर, बीबीआयएलचा संयुक्त प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 05:11 AM2020-05-11T05:11:13+5:302020-05-11T05:12:13+5:30

लस तयार करण्यासाठी जगभरात अनेकदेश प्रयत्नशील आहेत. अमेरिका, इंग्लंड, इटली, ब्रिटन, इस्रायल आदी देशांचा यात समावेश आहे. त्यामध्ये एनआयव्ही-बीबीआयएच्या संयुक्त संशोधन प्रकल्पामुळे आता भारतही या देशांत सामील झाला आहे.

coronavirus: ICMR, BBIL joint venture to find vaccine against Covid-19 | coronavirus: कोविड-१९ वरील प्रतिबंधक लस शोधण्यासाठी आयसीएमआर, बीबीआयएलचा संयुक्त प्रकल्प

coronavirus: कोविड-१९ वरील प्रतिबंधक लस शोधण्यासाठी आयसीएमआर, बीबीआयएलचा संयुक्त प्रकल्प

Next

नवी दिल्ली : कोविड-१९ (कोरोना) विषाणूवर प्रतिबंधक लस शोधून काढण्यासाठी इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) व भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड (बीबीआयएल) हे संयुक्त संशोधन प्रकल्प राबविणार आहेत. आयसीएमआरची पुणे येथे नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही) ही संस्था असून तिच्या सहकार्याने ही लस विकसित केली जाणार आहे.
लस तयार करण्यासाठी जगभरात अनेकदेश प्रयत्नशील आहेत. अमेरिका, इंग्लंड, इटली, ब्रिटन, इस्रायल आदी देशांचा यात समावेश आहे. त्यामध्ये एनआयव्ही-बीबीआयएच्या संयुक्त संशोधन प्रकल्पामुळे आता भारतही या देशांत सामील झाला आहे. स्वदेशी बनावटीची ही लस बनविण्यात भारताला यश आल्यास ते देशाच्या संशोधन क्षेत्रासाठी ललामभूत ठरणारे कार्य असेल. या संशोधनासाठी प्राण्यांवर तसेच पुढील टप्प्यांत माणसांवर प्रयोग करावे लागतील. त्याबद्दलच्या परवानग्या वेळेत मिळण्यासाठी आयसीएमआर बीबीआयएलला मदत करेल.

फ्लूच्या औषधावरही चाचण्या
च्कोविड-१९च्या विषाणूने संपूर्ण जगाला ग्रासले असून भारतातही संसर्गाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजारावर रामबाण उपाय शोधण्यासाठी फ्लूसारख्या तापावर दिल्या जाणाऱ्या औषधांवरही जगभरात प्रयोग सुरू आहेत.
च्यातील काही प्रयोगांमध्ये माणसांवरही चाचण्या सुरू झाल्या आहेत. मात्र अद्याप कोणत्याही देशाला प्रतिबंधक लस निर्माण करण्यात यश आलेले नाही. या वर्षाच्या अखेरीपर्यंत अमेरिकेत कोविड-१९ विषाणूवरील प्रतिबंधक लस तयार होण्याची शक्यता आहे असे त्या देशाने मध्यंतरी जाहीर केले होते.

Web Title: coronavirus: ICMR, BBIL joint venture to find vaccine against Covid-19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.