CoronaVirus कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाउन नसते तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 06:28 AM2020-04-08T06:28:38+5:302020-04-08T06:28:52+5:30

एका रुग्णाकडून महिनाभरात ४०६ जणांना संसर्ग होण्याची शक्यता

Coronavirus If there was no lockdown in the country, patients would be in lakhs | CoronaVirus कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाउन नसते तर...

CoronaVirus कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाउन नसते तर...

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कोणतेही उपाय योजले नाहीत तर कोरोनाची लागण झालेल्या एका रुग्णाकडून महिनाभरात सरासरी ४०६ लोकांना संसर्ग होऊ शकतो, अशा आकडेवारीचा हवाला देत केंद्र सरकारने ‘लॉकडाऊन’ आणि ‘सोशल डिस्टन्सिंग’ यासारख्या उपायांच्या गरजेवर मंगळवारी पुन्हा एकदा भर दिला. सध्या केल्या जात उपाययोजनांमुळे एका बाधित रुग्णापासून २ किंवा ३ व्यक्तींना संसर्ग होण्याची भीती आहे.


कोरोनासंबंधीच्या दैनंदिन ब्रीफिंगमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अगरवाल यांनी या संदर्भात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) केलेल्या एका अभ्यास पाहणीचा संदर्भ देत वरील माहिती दिली. एखाद्या साथीच्या रोगाचा संसर्ग ठराविक काळामध्ये एका व्यक्तीकडून किती लोकांना होऊ शकतो याचे प्रमाण गणिती पद्धतीने ठरविले जाते व त्या गुणोत्तरास ‘आर-ओ’ असे म्हटले जाते. 


अगरवाल म्हणाले की, ‘आयसीएमआर’ने केलेल्या पाहणीत सध्याच्या कोरोना साथीत संसर्गाच्या तीव्रतेचे हे गुणोत्तर १.५ ते ४ व्यक्ती असल्याचा अंदाज आहे. याची सरासरी काढून हे गुणोत्तर २.५ आहे असे गृहित धरले तरी एका ‘पॉझिटिव्ह’ रुग्णाकडून महिनाभरात इतरांना होऊ शकणाऱ्या ंससर्गाचे संभाव्य उत्तर ४०६ व्यक्ती असे येते. पण लोकांचे परस्परांच्या संपर्कात येण्याचे प्रमाण वरील उपाय योजून ७५ टक्क्यांनी जरी कमी केले तरी प्रतिव्यक्ती संसर्गाची संख्या सरासरी २ किंवा ३ व्यक्ती एवढे कमी होऊ शकते.

रेल्वे कोचचे आयसोलेशन
बेडमध्ये रूपांतर
रेल्वेने २५०० रेल्वे कोचचे
रूपांतर आयसोलेशन बेडमध्ये
केले आहे. देशात १३३ ठिकाण रेल्वे कोच तयार आहेत. त्यात एकूण ४० हजार बेड असतील. कोरोनाविरोधातील लढाईला रेल्वेच्या योगदानामुळे मोठे बळ मिळाले आहे. एका दिवसात
३७५ रेल्वे कोचचे आयसोलेशन बेडमध्ये रूपांतर करण्यात आले.

चाचण्यांची
संख्या वाढली
आयसीएमआरचे शास्त्रज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर म्हणाले, चाचण्यांची संख्या वाढली आहे. सोमवारी एका दिवसात १० हजार ७०६ चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत १ लाख ७०६ चाचण्या केल्या आहेत.

तीन स्तरांवर
यंत्रणा तयार ठेवा
केंद्राने राज्यांना तीन स्तरावर आरोग्य यंत्रणा तयार ठेवण्याची सूचना केली आहे. कोविड केअर सेंटर, डेडिेकेटेड कोविड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोविड रूग्णालय उभारण्याची मार्गदर्शिकाही प्रसिद्ध केली आहे. कोरोनाची लागण झाल्याची सौम्य लक्षणे, संसर्ग असल्याचा संशय असलेल्यांना केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येईल.

Web Title: Coronavirus If there was no lockdown in the country, patients would be in lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.