Coronavirus: रुग्णसंख्येत वाढ, लहान मुलांना धोकादायक; कोरोनाची चौथी लाट आली?, तज्ज्ञ म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 03:29 PM2022-04-18T15:29:23+5:302022-04-18T15:30:32+5:30

गुरुवारी दिल्लीत कोरोनाचे ३२५ रुग्ण समोर आले होते. तर पॉझिटिव्हीटी रेट २.३९ इतका होता. शुक्रवारी ३.९५ पॉझिटिव्हीटी रेटसह ३६६ रुग्ण आढळले होते.

Coronavirus: increase in the number of patients, dangerous to young children; The fourth wave of corona came ?, what experts say . | Coronavirus: रुग्णसंख्येत वाढ, लहान मुलांना धोकादायक; कोरोनाची चौथी लाट आली?, तज्ज्ञ म्हणतात...

Coronavirus: रुग्णसंख्येत वाढ, लहान मुलांना धोकादायक; कोरोनाची चौथी लाट आली?, तज्ज्ञ म्हणतात...

Next

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून नियंत्रणात आलेला कोरोनानं पुन्हा डोकं वर काढल्याचं चित्र समोर आले आहे. राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णसंख्येत होणाऱ्या वाढीमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. रविवारी दिल्लीत ५१७ कोरोना रुग्ण आढळले. तर संक्रमणाचा दर ४.२१ टक्क्यावर पोहचला आहे. ज्या वेगाने कोरोना रुग्णसंख्येत वाढ होतेय त्यामुळे कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र अद्याप कोरोना लाटेबाबत ठोस सांगू शकत नाही असं तज्ज्ञांचे म्हणणं आहे.

सरकारचं म्हणणं आहे की, सध्या घाबरण्याची गरज नाही. कारण हॉस्पिटलमध्ये भरती होण्याचं प्रमाण कमी आहे. परंतु होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या संक्रमितांची संख्या वेगाने वाढण्याची शक्यता आहे. शनिवारी दिल्लीत ७७२ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये होते. तीच संख्या रविवारी वाढून ९६४ इतकी झाली आहे. १ एप्रिलला होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या संक्रमितांची संख्या ३३२ इतकी होती. दिल्लीत कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे.

गुरुवारी दिल्लीत कोरोनाचे ३२५ रुग्ण समोर आले होते. तर पॉझिटिव्हीटी रेट २.३९ इतका होता. शुक्रवारी ३.९५ पॉझिटिव्हीटी रेटसह ३६६ रुग्ण आढळले होते. शनिवारी पॉझिटिव्हीटी रेट ५.३३ टक्के होता तर रुग्णसंख्या ४६१ झाली होती. तर रविवारी संक्रमण दरात घट झाली परंतु नवीन संक्रमित रुग्णांमध्ये ५० हून अधिक वाढ झाल्याचं दिसून आले. कोरोना चाचण्या इतक्या जास्त प्रमाणात होत नाही. रविवारी १२ हजार २७० कोविड चाचणी झाली. शनिवारी ८ हजार ६४६ चाचणी करण्यात आली. इतक्या कमी चाचणीत संक्रमणाचा दर ५ टक्क्यांपर्यंत पोहचणे चिंतेची बाब आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार ५ टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हीटी रेट चिंताजनक आहे.

लहान मुलांना धोका वाढला

दिल्ली आणि लगतच्या एनसीआर भागातील अनेक शाळांमध्ये मुलांना संसर्ग झाल्याची प्रकरणेही समोर येऊ लागली आहेत. शाळांमध्ये मुलांना संसर्ग झाल्याचे आढळल्यावर दिल्ली सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. गौतम बुद्ध नगर आणि गाझियाबादमध्येही अनेक शाळांमध्ये मुलांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. मात्र, सध्या काळजी करण्यासारखे काही नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. AIIMS चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की, घाबरण्याचे काही कारण नाही, मागील लाटेंमधील आकडेवारी पाहता असे दिसून येते की जरी मुलांना संसर्ग झाला तरी त्यांच्यात अतिशय सौम्य लक्षणे असतात आणि त्यांच्यावर लवकर उपचार केले जातात.

रुग्ण वाढण्याचं कारण काय?

ओमायक्रॉनमुळे आलेली तिसरी लाट जवळजवळ थांबली होती, परंतु आता पुन्हा एकदा संक्रमित लोकांची संख्या वाढू लागली आहे. रूग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत नसली तरी होम आयसोलेशनमध्ये राहणाऱ्या बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पण याचे कारण काय? त्यावर तज्ज्ञ म्हणतात, तिसऱ्या लाटेनंतर संसर्ग कमी झाल्यानंतर सर्व निर्बंध उठवण्यात आल्याचे सांगितले आहे. दिल्लीतही मास्क घालण्याची सक्ती रद्द करण्यात आली आहे. लोकांचा बेफिकीरपणाही वाढला होता. या सर्व कारणांमुळे संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे.

Web Title: Coronavirus: increase in the number of patients, dangerous to young children; The fourth wave of corona came ?, what experts say .

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.