coronavirus : ज्या देशांनी नेहमीच दिला त्रास, त्यांनाही भारत पुरवतोय कोरोनावरील हे खास औषध 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 05:51 PM2020-04-15T17:51:08+5:302020-04-15T17:56:22+5:30

कोरोना विषाणूच्या फैलावामुळे अनेक देश त्रस्त आहेत. त्यातच कोरोनावर अद्याप लस उपलब्ध नसल्याने अनेक देशांसमोर संकट उभे राहिले आहे.

coronavirus: India is also providing drug to the many countries BKP | coronavirus : ज्या देशांनी नेहमीच दिला त्रास, त्यांनाही भारत पुरवतोय कोरोनावरील हे खास औषध 

coronavirus : ज्या देशांनी नेहमीच दिला त्रास, त्यांनाही भारत पुरवतोय कोरोनावरील हे खास औषध 

Next
ठळक मुद्दे कोरोनावर अद्याप लस उपलब्ध नसल्याने अनेक देशांसमोर संकट उभे राहिले आहेCAA, कलम 370 या मुद्यांवरून भारताविरोधात भूमिका घेणाऱ्या मलेशियाला कोरोनावरील उपचारांसाठी हायड्रोक्सिक्लोरोक्वीन या औषधाची भारताकडे मागणी केली आहेभारताकडून अमेरिका, ब्रिटन, स्पेन, जर्मनी, रशिया, संयुक्त अरब अमिराती, जॉर्डन, युगांडा, कुवेत, मलेशिया या देशांना हायड्रोक्सिक्लोरोक्वीनची निर्यात होत आहे

नवी दिल्ली -  सध्या जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या विषाणूच्या फैलावामुळे अनेक देश त्रस्त आहेत. त्यातच कोरोनावर अद्याप लस उपलब्ध नसल्याने अनेक देशांसमोर संकट उभे राहिले आहे. त्यातच कोरोनावर तात्पुरता उपाय म्हणून हायड्रोक्सिक्लोरोक्वीन हे औषध देण्यात येत आहे. त्यामुळे या औषधाचा प्रमुख पुरवठादार असलेल्या भारताकडे जगभरातील देश या औषधाची मागणी करत आहेत. या देशांमध्ये भारताला विरोध करण्याऱ्या देशांचाही समावेश आहे. मात्र भूतकाळातील कटू आठवणी विसरून भारत या देशांना मदत करण्यासाठी पुढे सरसावला आहे.

आंतरराष्ट्रीय संबंध हे गुंतागुंतीचे असतात असे म्हटले जाते. काही अपवाद वगळता जगातील कुठलाही देश हा कुणाचा कायमचा मित्र वा शत्रू नसतो. म्हणूनच काही दिवसांपूर्वी CAA, कलम 370 या मुद्यांवरून भारताविरोधात भूमिका घेणाऱ्या मलेशियाला कोरोनावरील उपचारांसाठी हायड्रोक्सिक्लोरोक्वीन या औषधाची भारताकडे मागणी करावी लागली आहे. मलेशियाप्रमाणेच ब्रिटननेही अनेक वेळा भारतविरोधी भूमिका घेतली होती. कलम 370 हटवण्यात आल्यानंतर त्याला विरोध करणाऱ्या प्रमुख देशांमध्ये ब्रिटन प्रमुख होता. मात्र आता भारताकडून ब्रिटनलाही हायड्रोक्सिक्लोरोक्वीनचा पुरवठा केला जात आहे. 

दरम्यान, हायड्रोक्सिक्लोरोक्वीन या औषधाचा भारत प्रमुख पुरवठादार असून, सध्या भारताकडून अमेरिका, ब्रिटन, स्पेन, जर्मनी, रशिया, संयुक्त अरब अमिराती, जॉर्डन, युगांडा, कुवेत, मलेशिया या देशांना हायड्रोक्सिक्लोरोक्वीनची निर्यात होत आहे. हायड्रोक्सिक्लोरोक्वीनच्या बदल्यात भारताने N-95 मास्क, व्हेंटिलेटर, PPE सूट यांची मागणी केली आहे. 

Web Title: coronavirus: India is also providing drug to the many countries BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.