Coronavirus : कोरोनाविरोधातील लढाईत जगातील देशांसाठी भारत ठरला 'देवदूत'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 11:21 AM2020-04-11T11:21:33+5:302020-04-11T11:23:45+5:30
Coronavirus : जगभरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 1 लाखांच्या वर पोहोचला आहे.
नवी दिल्ली - कोरोना व्हायरसमुळे इटली, स्पेन, अमेरिका आणि युरोपमध्ये गंभीर परिस्थिती ओढवली आहे. जगभरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 1 लाखांच्या वर पोहोचला आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही इटली, स्पेन आणि अमेरिकेतील रुग्णांची आहे. भारतातही कोरोनाबाधितांचा आकडा सात हजारांच्या वर पोहोचला आहे. तर 239 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतंही औषध उपलब्ध झालेलं नाही. कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन (एचसीक्यू) या गोळ्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. कोरोनाविरोधातील लढाईत भारत जगातील अनेक देशांसाठी देवदूत ठरला आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यामुळे कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात इतर देशांच्या तुलनेत भारत यशस्वी झाला आहे. तसेच कोरोनाशी लढण्यासाठी ज्या देशांना हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या गोळ्यांची आवश्यकता असेल त्यांच्या मागण्यांची पूर्तता केली जाईल असे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत. त्यामुळे या गोळ्या तयार करणाऱ्या कंपन्यांनीही निर्मिती कित्येक पटीने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने अनेक देशांना आपल्याकडे उपलब्ध असलेल्या औषधांचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला असून हायड्रोक्सीक्लोरोक्वीनसाठी 13 देशांची यादी तयार केल्याची माहिती मिळत आहे.
India has cleared first list of 13 countries for Hydroxychloroquine. USA had asked for 48 lakh tablets of HCQ, India has sanctioned 35.82 lakh tablets. India has also sent 9MT API to US, as per their request: Sources
— ANI (@ANI) April 10, 2020
भारताने हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा पुरवठा करण्यासाठी गरजेनुसार 13 देशांची एक यादी तयार केली आहे. यामध्ये अमेरिकेनने 48 लाख गोळ्यांची मागणी केली होती. मात्र सध्या त्यांना 35.85 लाख गोळ्या दिल्या जाणार आहेत तर जर्मनीला 50 लाख आणि बांग्लादेशला 20 लाख हायड्रोक्सीक्लोरोक्वीन गोळ्यांचा पुरवठा केला जाणार आहे. श्रीलंका आणि नेपाळला 10 लाख, अफगाणिस्तानला 5 लाख तर भूतान आणि मालदीवला 2 लाख गोळ्या देण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Coronavirus : चिंताजनक! गेल्या 24 तासांत देशात 1035 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या 7447 वरhttps://t.co/gZB1iaSyzh#CoronaUpdatesInIndia#CoronaLockdown
— Lokmat (@MiLOKMAT) April 11, 2020
भारत अमेरिका, ब्राझील आणि जर्मनीला 'अॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रिडेंटस' (API) पाठवणार आहे. याचा उपयोग औषधं बनवण्यासाठी केला जातो. अमेरिकेला आत्तापर्यंत 9 मेट्रिक टन API पाठवण्यात आलं आहे. तर जर्मनीला पहिला टप्प्यात 1.5 मेट्रिक टन API पाठवण्यात आलं आहे . तर ब्राझीलला पहिल्या टप्प्यातील 0.50 मेट्रिक टन API पाठवण्यात येणार आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात एकूण 1035 नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर तब्बल 40 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 7447 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 239 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.
Coronavirus : कर्तव्यनिष्ठेला सलाम! 7 वर्षांच्या लेकीला घरात कुलूप बंद करून दाम्पत्याची देशसेवा https://t.co/IUdGjOCr7Y#CoronaUpdatesInIndia#CoronaLockdown
— Lokmat (@MiLOKMAT) April 11, 2020
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : चिंताजनक! गेल्या 24 तासांत देशात 1035 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या 7447 वर
Coronavirus : कर्तव्यनिष्ठेला सलाम! 7 वर्षांच्या लेकीला घरात कुलूप बंद करून दाम्पत्याची देशसेवा
CoronaVirus लॉकडाउन संपणार की वाढणार? आज ठरणार
CoronaVirus कोरोनाच्या सामूहिक संसर्गाला सुुरुवात?