CoronaVirus News: लवकरच देशात कोरोनाचं दहन?; गेल्या ९८ दिवसांत जे घडलं नाही, ते काल घडलं
By कुणाल गवाणकर | Published: October 25, 2020 08:59 AM2020-10-25T08:59:40+5:302020-10-25T09:04:20+5:30
CoronaVirus News: देशातील कोरोना वाढीचा वेग मंदावला; सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ७ लाखांच्या खाली
नवी दिल्ली: देशातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग कमी होताना दिसत आहे. मात्र अजूनही परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. काल दिवसभरात ५८० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या ९८ दिवसांत पहिल्यांदाच इतक्या कमी मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोना संकटाची तीव्रता काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे.
देशातील विविध भागांमध्ये कोरोनाचा वेग आटोक्यात येत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. सप्टेंबरच्या मध्यावर कोरोनानं देशात अक्षरश: थैमान घातलं होतं. १५ सप्टेंबरला देशात कोरोनामुळे १ हजार २७५ जणांचा मृत्यू झाला. मात्र आता परिस्थिती नियंत्रणात येत आहे. काल देशात ५८० जणांच्या मृत्यूंची नोंद झाली. गेल्या ९८ दिवसांत प्रथमच इतक्या कमी प्रमाणात कोरोना रुग्ण दगावले.
मुंबईच्या नावे कोरोना बळींची नकोशी नोंद; बनले देशातील पहिले शहर
गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. काल दिवसभरात देशात ५१ हजार २३ कोरोना रुग्ण आढळून आले. देशात आतापर्यंत ७८ लाख ६३ हजार ९१३ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. सध्याच्या घडीला ६.७५ लाख कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ७० लाख ६९ हजार ९९९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८९.९ टक्क्यांवर जाऊन पोहोचलं आहे.
आनंदाची बातमी! कोरोनाच्या पहिल्या औषधाला FDA कडून मंजुरी, कमी वेळात रुग्ण बरे होणार, तज्ज्ञांचा दावा
केरळमधील कोरोना रग्णांच्या संख्येत वाढ
देशात कोरोनाचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळून आला. त्यानंतर केरळ सरकारनं तातडीनं हालचाली सुरू केल्या. त्यामुळे राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला. मात्र आता केरळमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. काल दिवसभरात केरळमध्ये कोरोनाच्या ८ हजार २५३ रुग्णांची नोंद झाली.
....म्हणून कोरोना संक्रमण झाल्यानंतर केस गळण्याची समस्या उद्भवते, तज्ज्ञांचा खुलासा
महाराष्ट्रातून गुड न्यूज; दिल्लीनं चिंता वाढवली
दिल्लीत काल ४ हजार ११६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. १८ सप्टेंबरनंतर प्रथमच दिल्लीत इतक्या मोठ्या संख्येनं कोरोना रुग्ण आढळले. पश्चिम बंगालमध्येही कोरोना संकटाची तीव्रता वाढली आहे. काल पश्चिम बंगालमध्ये ४ हजार १४८ नवे कोरोना रुग्ण सापडले. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सलग सहाव्या दिवशी घट पाहायला मिळाली. काल दिवसभरात राज्यात ६ हजार ४१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर १३७ जणांचा मृत्यू झाला.