Coronavirus: कोरोनानंतर राजकीय चित्र बदलणार; २०२२ मध्ये खास ‘दूत’ प्रचारासाठी लोकांच्या भेटीला येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 09:35 PM2021-06-20T21:35:38+5:302021-06-20T21:38:01+5:30
२०२२ मध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, गोवा आणि गुजरात या राज्यांचा समावेश आहे.
नवी दिल्ली – धोकादायक कोरोना व्हायरसच्या संकटात भारतात आता सार्वजनिक सभा घेणं जीवघेणं ठरणारं आहे. त्यातच पुढील काळात होणाऱ्या निवडणुकांचा प्रचार कसा होणार अशी चिंता राजकीय पक्षांना लागली आहे. परंतु यावर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं तोडगा निघाला आहे. २०२२ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये राजकीय नेत्यांकडून ह्यूमनॉइड रोबोट निवडणुकीत प्रचार करताना दिसणार आहेत.
वनस्टँड इंडिया प्रायव्हेट लिमिटेडनं निर्मित केलेल्या या रोबोटचं नाव ‘दूत’(Doot) असं ठेवण्यात आलं आहे. हा एक असा ह्यूमनॉईड रोबोट आहे. जो आवाज आणि चेहऱ्याची ओळख पटवून माणसाच्या शरीरातील हावभावाप्रमाणे जनतेवर त्याची छाप पाडू शकतो. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांमध्ये हा रोबोट प्रचार करत असल्याचं दिसून येईल. निवडणुकांमध्ये रोबोटचा वापर करण्याबाबत कंपनी सध्या विविध राजकीय पक्षांसोबत चर्चा करत आहे. त्यामुळे भविष्यात रोबोटच्या मदतीनं घरोघरी प्रचार करणं शक्य होणार आहे.
२०२२ मध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, गोवा आणि गुजरात या राज्यांचा समावेश आहे. एप्रिल महिन्यात तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत एका नवीन राजकीय संघटना इंडिया मक्कल मुनेत्र काची यांनी पहिल्यांदा प्रचारात ह्यूमनॉईड रोबोटचा वापर केला होता. 'दूत' कोरोना संकटकाळात राजकीय पक्षांच्या मदतीला धावून आला आहे.
काय आहे ‘दूत’चं वैशिष्टं?
वनस्टँड इंडियाचे संचालक कुमार कन्हैया म्हणाले की, रोबोटचा रोवर एक ऑल-व्हिल ड्रायव्ह गियरबॉक्ससह जोडला आहे. ज्यामुळे रोबोट कशाही पद्धतीने सहजरित्या चालण्यास सक्षम आहे.
आर्टिफिशियल इंटेलीजेंस(AI) इनबेल्ड वॉइस रिकॉग्ननिशनच्या माध्यमातून राजकीय नेत्याच्या आवाजात ह्मूनरॉइड जनतेला संबोधित करू शकतो.
एका टीमद्वारे वेळोवेळी प्रश्न आणि प्रतिसादाबद्दल निरीक्षण केले जाईल. ज्याच्याकडे सर्वसामान्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असेल.
दूत एक कस्टममेड सर्वो मोटरची लेंस आहे. जी कमरेवरील शरीर सहजपणे झुकवून उभं राहू शकतं. १४० डिग्रीपर्यंत तो फिरू शकतो. असं करणारा तो देशातील एकमेव ह्यूमनरॉइड आहे.
रोबोटच्या डोक्यावर एक एचडी कॅमेरा लावण्यात आला आहे. ज्यामुळे ऑपरेटर समोरील व्यक्तींना बघून उपस्थित लोकांना रेकॉर्ड करण्याची क्षमता ठेवतो.
4th जनरेशन सर्वो मोटर जी पूर्णत: देशात बनली आहे. विना ब्रेकडाऊन अथवा सर्विंसिंगची आवश्यकतेशिवाय खूप काळ काम करते.
ह्यूमननॉइड इंडस्ट्रियल ग्रेड कंपोनेंटसह एक एल्यूमिनिअम फ्रेम बनवण्यात आली आहे. ह्यूमननॉईड रोबोटमध्ये १० जॉईंट्स आहेत. ज्यामुळे तो लोकांना हात मिळवण्यासही सक्षम आहे.
वेळ वाचणार अन् संक्रमणही पसरणार नाही
महामारीच्या काळात राजकीय नेते कार्यकर्त्यांना भेटू शकत नाहीत. हा रोबोट प्रचारक म्हणून वेळ वाचवेल त्याचसोबत एकाच वेळी ह्यूमननॉइड रोबोट अनेक ठिकाणी जाऊ शकतो. रोबोट प्रचाराची सुरूवात न केवळ विधानसभा निवडणुकीसाठी होईल तर लोकांची गर्दी टाळण्यासाठी नवीन पर्यायही ठरू शकतो असं कंपनीचे संचालक म्हणाले.
डेल्टा प्लस व्हेरिएंट म्हणजे काय? एकाच गावात आढळले ५ रुग्ण, संपूर्ण गावात लॉकडाऊन #Maharashtra#Coronavirus#deltaplusVarianthttps://t.co/Kg2hS1oxAr
— Lokmat (@MiLOKMAT) June 20, 2021