CoronaVirus : 2-3 वर्षांतच होऊ शकतो कोरोनाचा खात्मा, फक्त करावं लागेल 'हे' मोठं काम; अदर पूनावालांचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 05:02 PM2021-07-01T17:02:56+5:302021-07-01T17:05:06+5:30

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसला आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी अदर यांनी आपल्या सर्वच प्लांटमध्ये अधिकाधिक कर्मचाऱ्यांना लस तयार करण्याच्या कामात लावले आहे.

CoronaVirus India global forum 2021 Adar Poonawala says to tackle coronaVirus we will have to adopt this approach | CoronaVirus : 2-3 वर्षांतच होऊ शकतो कोरोनाचा खात्मा, फक्त करावं लागेल 'हे' मोठं काम; अदर पूनावालांचा विश्वास

CoronaVirus : 2-3 वर्षांतच होऊ शकतो कोरोनाचा खात्मा, फक्त करावं लागेल 'हे' मोठं काम; अदर पूनावालांचा विश्वास

Next

नवी दिल्ली - सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे (SII) सीईओ अदर पूनावाला (Adar Poonawalla) यांनी लसींच्या (Vaccine) पुरवठ्यासंदर्भातील आव्हानांवर चर्चा केली आहे. या स्थितीचा सामना करण्यासाठी काय करायला हवे, यावर त्यांनी भाष्य केले. ते बुधवारी इंडिया ग्लोबल फोरम 2021ला संबोधित करत होते. (CoronaVirus India global forum 2021 Adar Poonawala says to tackle coronaVirus we will have to adopt this approach)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसला आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी अदर यांनी आपल्या सर्वच प्लांटमध्ये अधिकाधिक कर्मचाऱ्यांना लस तयार करण्याच्या कामात लावले आहे. तसेच, कोरोनावर मात करण्यासाठी ज्या देशांकडे लस तयार करण्याची अधिक क्षमता आहे, अशा देशांनी समोर यायला हवे, असेही अदर यांनी म्हटले आहे. 

"कोरोना लस बनवणाऱ्या वैज्ञानिकांना 'भारतरत्न' द्या", नेत्याची मागणी; मोदींना लिहिलं पत्र 

अदर म्हणाले, "ही महामारी 2-3 वर्षांत संपुष्टात येण्याची शक्यता आहे. अशात आपल्याला लशीची उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढवावी लागेल. पाच वर्षांच्या आतच दुसरी महामारीही येऊ शकते. पुन्हा आपल्याला नव्याने गोष्टींना सुरुवात करावी लागेल. त्यामुळे आपण पुढील 15 वर्षांसाठी आपली क्षमता का विकसित करू नये."

युरोपियन मेडिसिन एजन्सीची मंजुरी मिळण्याचा विश्वास -
येत्या महिन्याभरात आपल्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीला कोविशिल्डला युरोपियन मेडिसिन एजन्सीची मंजुरी मिळण्याचा भरवसा असल्याचेही पूनावाला यांनी नमूद केले आहे. "व्हॅक्सिन पासपोर्टचा मुद्दा देशांदरम्यान परस्पर आधारावर असला पाहिजे. ईएमएमध्ये अर्ज करण्यासाठी सांगण्याचा मुद्दा अगदी योग्य आहे. आमचे भागीदार अॅस्ट्राझेनकाच्या माध्यमातून ते एका महिन्यापूर्वीच करण्यात आले आहे आणि त्यासाठी एक वेळही लागतो," असेही पूनावाला म्हणाले. 

CoronaVirus News: अब तक ९! कोविशील्ड लस घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी; लवकरच मोठा दिलासा अपेक्षित

ईएमएकडे केला अर्ज -
यूके एमएचआरए, डब्ल्यूएचओ यांच्या मंजुरी प्रक्रियेसदेखील वेळ लागला आणि आम्ही ईएमएकडे अर्ज केला. आम्हाला पूर्ण विश्वास आहे, की एका महिन्यात ईएमए कोविशिल्ड लसीला मंजुरी देईल. याला WHO, इग्लंड एमएचआरएद्वारे मंजुरी देण्यात आली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: CoronaVirus India global forum 2021 Adar Poonawala says to tackle coronaVirus we will have to adopt this approach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.