Coronavirus : कोरोनाचा मुकाबला करण्याची भारताकडे मोठी क्षमता, जागतिक आरोग्य संघटनेला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 01:06 AM2020-03-25T01:06:32+5:302020-03-25T01:07:24+5:30
Coronavirus : जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन विभागाचे संचालक डॉ. रोडेरिको आॅफ्रिन यांनी सांगितले की, कोरोनाच्या मुकाबल्यासाठी रेल्वे, आंतरराज्य बस व मेट्रो सेवा वेळीच स्थगित केली आहे.
नवी दिल्ली : कांजण्या, पोलिओचे निर्मूलन करण्याचा भारताकडे प्रदीर्घ अनुभव आहे. कोरोनाच्या साथीचा मुकाबला करण्याचीही भारताची क्षमता आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी संचालक जे. रायन यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की, भारत मोठ्या लोकसंख्येचा देश आहे. याआधी काही आजारांचे निर्मूलन भारताने करून दाखवले आहे. त्या अनुभवाच्या पाठबळावर भारताने कोरोनाचाही यशस्वीपणे मुकाबला करावा.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन विभागाचे संचालक डॉ. रोडेरिको आॅफ्रिन यांनी सांगितले की, कोरोनाच्या मुकाबल्यासाठी रेल्वे, आंतरराज्य बस व मेट्रो सेवा वेळीच स्थगित केली आहे. अनेक ठिकाणी लॉकडाउन केले आहे. या निर्णयांतून कोरोनाचे संकट परतवून लावण्याचा भारताचा निर्धार दिसून येतो.