दिलासादायक! कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताचा रिकव्हरी रेट वाढला, पण 66 टक्के रुग्ण फक्त 5 राज्यांतून
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 06:31 PM2021-06-04T18:31:41+5:302021-06-04T18:32:34+5:30
कोरोनाच्या ताज्या स्थितीसंदर्भात आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले, रिकव्हरी रेटमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. सध्या रिकव्हरी रेट 93.1 टक्के एवढा आहे.
नवी दिल्ली - केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी देशातील कोरोना संक्रमणाच्या स्थितीची माहिती दिली. मंत्रालयाने म्हटले आहे, की गेल्या 8 दिवसांपासून देशात रोज 2 लाखपेक्षा कमी कोरोना रुग्ण समोर येत आहेत. एकूण दैनंदिन कोरोना बाधितांची संख्या 68 टक्यांनी घटली आहे. मात्र, 5 राज्यांतून अद्यापही 66 टक्के कोरोना रुग्ण समोर येत आहेत तर उरवरीत 31 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतून 33 टक्के रुग्ण समोर येत आहेत. तर गेल्या 24 तासांत एकूण 1,32,000 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. (Coronavirus in india health ministry says 66 percent cases in five states)
कोरोनाच्या ताज्या स्थितीसंदर्भात आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले, रिकव्हरी रेटमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. सध्या रिकव्हरी रेट 93.1 टक्के एवढा आहे. देशातील 377 जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांनी कमी आहे. आरोग्यमंत्रालयाने म्हटले आहे, की सात मेरोजी कोरोना पीकवर पोहोचल्यानंतर, आतापर्यंत कोरोना बाधितांच्या संख्येत 68 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. 10 मेरोजी उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या पीकवर पोहोचल्यानंतर, आतापर्यंत त्यात 21 लाखहून अधिकची घट झाली आहे.
मंत्रालयाने म्हटले आहे, की दैनंदिन रुग्णसंख्येत 68 टक्क्यांची घट झाल्याचे दिसत आहे. तर 66 टक्के रुग्ण 5 राज्यांतून येत आहेत. 33 टक्के कोरोना बाधित रुग्ण 31 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातून येत आहेत. यावरून कोरोना व्हायरस नियंत्रणात येत असल्याचे दिसत आहे. सध्या 377 जिल्ह्यांत कोरोना संक्रमणाचा दर पाच टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, कोरनाला आळा घालण्याच्या उपायांत अथवा लसीकरणात ढिलाई केली गेली, तर पुन्हा कोरोना रुग्ण संख्येत वाढ होऊ शकते. आपल्याला कोरोना विरोधी लसीकरणाचे लक्ष साध्य करण्यासाठी वेळ मिळवावा लागणार आहे.
सरकारी माहितीनुसार, 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या किमान 43 टक्के लोकांना, तर 45 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या 37 टक्के लोकांना कोरोना विरोधी लस देण्यात आली आहे. कोरोनाविरोधी लशीचा किमान एक डोस घेतलेल्या लोकांचा विचार करता, भारताने अमेरिकेला मागे सोडले आहे.
CoronaVirus: करोनाला रोखण्यासाठी उत्तर कोरियाच्या हुकूमशहाचं फरमान, दिला अजब आदेश!