CoronaVirus: पावसाळ्यात कोविड-१९ ची दुसरी लाट येणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 03:42 AM2020-04-25T03:42:37+5:302020-04-25T06:57:23+5:30
भारतात पावसाळ्यात जुलै किंवा ऑगस्ट महिन्याच्या शेवटी रुग्णसंख्येत वाढ होऊन कोविड-१९ ची दुसरी लाट असण्याची शक्यता आहे, असे शास्त्रज्ञांनी म्हटले.
नवी दिल्ली : लॉकडाऊन मागे घेतला गेल्यानंतर कोरोना विषाणूचे (कोविड-१९) रुग्ण वाढण्याचे प्रमाण स्थिरावू शकेल किंवा काही आठवड्यांसाठी ते कमीदेखील होऊ शकेल; परंतु भारतात पावसाळ्यात जुलै किंवा ऑगस्ट महिन्याच्या शेवटी रुग्णसंख्येत वाढ होऊन कोविड-१९ ची दुसरी लाट असण्याची शक्यता आहे, असे शास्त्रज्ञांनी म्हटले. निर्बंध शिथिल केले गेल्यानंतर विषाणूचा फैलाव रोखण्यात त्याला किती यश येते, यावर त्या दोन महिन्यांत कोणते दिवस धोक्याचे ठरतील हे ठरेल, असे ते म्हणाले. रोजच्या रोज कोविड-१९ चे रुग्ण वाढण्याची अवस्था ही स्थिरावेल, एवढेच काय ती काही आठवड्यांत किंवा महिन्यांत कमीदेखील होईल, असे दिसते, असे शिव नाडर विद्यापीठातील गणित विभागातील सहायक प्राध्यापक सामित भट्टाचार्य यांनी सांगितले.