Coronavirus: चीनमधील ९० भारतीयांची तपासणी; येण्याचा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 01:31 AM2020-02-27T01:31:52+5:302020-02-27T01:32:15+5:30

अनेक दिवसांपासून भारतीय दूतावास चीन सरकारशी समन्वय साधत होता. अखेर बुधवारी त्यांची तपासणी झाली.

Coronavirus india prepares to evacuate 90 citizens from Wuhan | Coronavirus: चीनमधील ९० भारतीयांची तपासणी; येण्याचा मार्ग मोकळा

Coronavirus: चीनमधील ९० भारतीयांची तपासणी; येण्याचा मार्ग मोकळा

Next

सातारा : गेल्या महिन्यापासून चीनमध्ये अडकून पडलेल्या ९० भारतीयांची आरोग्य तपासणी बुधवारी झाली. त्यामुळे त्यांचा परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अनेक दिवसांपासून भारतीय दूतावास चीन सरकारशी समन्वय साधत होता. अखेर बुधवारी त्यांची तपासणी झाली. त्यांना भारतात आणण्यासाठी वुहान येथे विमान दाखल झाले आहे. त्यामुळे ते कोणत्याही क्षणी भारतात येऊ शकतात.

चीनमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाल्यानंतर भारताने खास विमानाने तेथे अडकलेल्या भारतियांना मायदेशी परत आणले आहे. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे तसेच तपासणी न झाल्याने अनेक भारतीय अद्याप चीनमध्ये अडकले आहेत. भारतीय दूतावासाने चीनमधील या भारतीयांना संदेश पाठवून तपासणीची माहिती दिली. आज संध्याकाळी सुरू झालेली तपासणी रात्री उशिरापर्यंत सुरूच होती.

सुटकेचा नि:श्वास
चीनमधील आपले नातेवाईक कधी परत येणार याची पालकांना काळजी होती. त्यांची वैद्यकीय तपासणी झाल्यामुळे ते आता भारतात येऊ शकतील, या विश्वासाने त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

Web Title: Coronavirus india prepares to evacuate 90 citizens from Wuhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.