Coronavirus : देशात कोरोनाचा कहर सुरूच; 24 तासांत तब्बल 35 हजार 499 नवे रुग्ण, 447 जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2021 11:10 AM2021-08-09T11:10:49+5:302021-08-09T11:11:35+5:30
रविवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत देशात लोकांना कोरोना लसीचे 50 कोटी 68 लाख 10 हजार 492 डोस देण्यात आले आहेत.
नवी दिल्ली - देशात जीवघेण्या कोरोना विषाणूची दुसरी लाट सुरूच आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 35 हजार 499 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. तर 447 लोकांचा मृत्यू झाला आहे. आता देशात सक्रिय रुग्णसंख्या चार लाख दोन हजार 188 एवढी आहे. तसेच, देशाचा रिकव्हरी रेट आता 97.40 टक्क्यांवर पोहोचला आहे. (Coronavirus India reports 35499 new cases in last 24 hours and 447 deaths)
आतापर्यंत लसीचे किती डोस?
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनसार, रविवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत देशात लोकांना कोरोना लसीचे 50 कोटी 68 लाख 10 हजार 492 डोस देण्यात आले आहेत. यांपैकी 55 लाख 91 हजार 657 डोस एका दिवसात देण्यात आले आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) म्हटले आहे, की भारतात कोरोना विषाच्या पार्श्वभूमीवर काल 13 लाख 71 हजार 871 नमुने तपासण्यात आले. तर आतापर्यंत एकूण 48 कोटी 17 लाख 67 हजार 232 नमुने तपासण्यात आले आहेत.
लसीकरण प्रमाणपत्र आता व्हॉट्सअॅपवर -
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी म्हटले आहे, की ज्यांनी कोरोना लस घेतली आहे, त्यांना आता काही सेकंदातच व्हॉट्सअॅपवर त्यांचे प्रमाणपत्र मिळवू शकते. सध्या, यासाठी लोकांना कोविन पोर्टलवर लॉग इन करून त्यांचे लसीकरण प्रमाणपत्र डाउनलोड करावे लागते.
व्हॉट्सअॅपवर प्रमाणपत्र मिळविण्यासाठी, संपर्क क्रमांक +91 9013151515 सेव्ह करा. यानंतर व्हॉट्सअॅपवर ‘कोविड सर्टिफिकेट’ टाइप करून पाठवा. यानंतर ओटीपी टाका आणि काही सेकंदात आपले प्रमाणपत्र मिळवा.
CoronaVirus News: राज्यात कोरोनाची तिसरी लाट कधी?; 'त्या' भाकितानं सगळ्यांचीच चिंता वाढवली