CoronaVirus Today: देशात कोरोनाची दुसरी लाट अद्यापही सुरूच; 24 तासांत समोर आले 41649 नवे रुग्ण, 593 जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 10:22 AM2021-07-31T10:22:42+5:302021-07-31T10:23:00+5:30

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनामुळे तब्बल 37 हजार 291 रुग्ण बरे झाले आहेत. (CoronaVirus in India)

CoronaVirus India today 41649 new cases and 593 deaths in india | CoronaVirus Today: देशात कोरोनाची दुसरी लाट अद्यापही सुरूच; 24 तासांत समोर आले 41649 नवे रुग्ण, 593 जणांचा मृत्यू 

CoronaVirus Today: देशात कोरोनाची दुसरी लाट अद्यापही सुरूच; 24 तासांत समोर आले 41649 नवे रुग्ण, 593 जणांचा मृत्यू 

Next

नवी दिल्ली - देशात कोरोना व्हायरसची दुसरी लाट अद्यापही संपलेली नाही. गेल्या 24 तासांत देशात तब्बल 41 हजार 649 नवे रुग्ण समोर आले आहेत. तसेच 593 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.  कोरोनामुळे देशात आतापर्यंत तब्बल 4 लाख 23 हजार 810 लोकांचा मृत्यू झाला आहे. जाणून घ्या, देसातील कोरोनाची स्थिती... (CoronaVirus India today 41649 new cases and 593 deaths in india)

गेल्या 24 तासांत 37 हजार 291 रुग्ण ठणठणीत - 
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनामुळे तब्बल 37 हजार 291 रुग्ण बरे झाले आहेत. यानंतर आता देशातील एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या 3 कोटी 7 लाख 81 हजार 263 वर पोहोचली आहे. आता देशातील सक्रीय रुग्ण संख्या कमी होऊन 4 लाख 8 हजार 920 वर पोहोचली आहे. आतापर्यंत देशात तब्बल 3 कोटी 16 लाख 13 हजार 993 कोरोना रुग्ण समोर आले आहेत.

Corona Vaccine: कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन मिक्सिंग डोसची चाचणी?

तिसरी लाट केरळमधून येण्याची भीती - 
कोरोना साथीला आवर घालण्यासाठी केरळने केलेले प्रयत्न जगभरात नावाजले गेले होते. पण आता त्याच केरळमध्ये पुन्हा रुग्ण वाढू लागले आहेत. मात्र तेथील मृत्युदर कमी आहे. गेल्या चार आठवड्यांपासून देशातील २२ जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून त्यात केरळमधील सात जिल्ह्यांचा समावेश आहे. भारतात कोरोनाची तिसरी लाट अद्याप आली नसली तरी तिची सुरुवात केरळमधून होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या राज्याचा एकूण संसर्गदर १२.९३ टक्के असून दर आठवड्याचे प्रमाण ११.९ टक्के आहे. देशात केरळमध्ये अँटिबॉडीज तसेच सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होण्याचे प्रमाण सर्वात कमी आहे. चौथ्या सिरो सर्वेक्षणात हे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. 

CoronaVaccine: लस घेतल्यानंतर किती दिवस मिळेल संरक्षण?; केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली महत्त्वाची माहिती

ईशान्य भारतातही बिकट स्थिती -
 ईशान्य भारतातील १३ जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामध्ये आसाम, मेघालय, मणिपूर. अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा या ५ राज्यांतील जिल्ह्यांचा समावेश आहे. मेघालयमधील पश्चिम गारो हिल्स प्रदेशात कोरोना रुग्णांची आकडेवारी ११० टक्क्यांनी वाढली आहे. अरुणाचल प्रदेशमधील पश्चिम सियांगमध्ये व मणिपूरमधील नोने भागात हे प्रमाण अनुक्रमे ३०० टक्के व २६६ टक्के आहे.
 

Web Title: CoronaVirus India today 41649 new cases and 593 deaths in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.