Coronavirus India Today: कोरोनानं पुन्हा टेन्शन वाढवलं! २४ तासांत ५०० हून अधिक जणांचा मृत्यू, गुजरातसह या राज्यांत रुग्णवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 02:18 PM2021-11-12T14:18:30+5:302021-11-12T14:19:56+5:30
Coronavirus India Latest Update: देश गेल्या दीड वर्षांहून अधिक काळापासून कोरोना संकटाला सामोरा जात आहे. दुसऱ्या लाटेनं हाहाकार उडवल्यानंतर सद्या देशात कोरोना रुग्ण संख्येत कमालीची घट होताना दिसली होती.
Coronavirus India Latest Update: देश गेल्या दीड वर्षांहून अधिक काळापासून कोरोना संकटाला सामोरा जात आहे. दुसऱ्या लाटेनं हाहाकार उडवल्यानंतर सद्या देशात कोरोना रुग्ण संख्येत कमालीची घट होताना दिसली होती. पण आता गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णांचे आकडे पुन्हा एकदा चिंता वाढवणारे ठरत आहेत. एका दिवसात देशात कोरोनामुळे ५०० हून अधिक जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोना रुग्णसंख्येत घट होत असली तरी अजूनही सतर्क राहण्याची अत्यंत गरज आहे. कारण मृत्यूंच्या संख्येनं सरकारचंही टेन्शन वाढलं आहे. यासोबतच गुजरातमध्येही रुग्णसंख्या वाढू लागली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात १२,५१६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर एकूण रुग्णांची संख्या आता ३,४४,१४,१८६ वर पोहोचली आहे. सक्रीय रुग्णांच्य संख्येत मात्र घट नोंदविण्यात आली आहे. देशात सध्या १,३७,४१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या २६७ दिवसातील हा सर्वात कमी आकडा आहे.
COVID-19 | India reports 12,516 new cases and 501 deaths in the last 24 hours; Active caseload stands at 1,37,416 ( lowest in 267 days): Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/i3Obejuvnr
— ANI (@ANI) November 12, 2021
सरकारनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या २४ तासांत ५०१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत मृत्यूंचा आकडा ४,६२,६९० वर पोहोचला आहे. सलग ३५ व्या दिवशी देशात कोरोना रुग्णांची संख्या २० हजाराहून दिसून आले आहेत. दुसरीकडे गुजरातमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं दिसून आलं आहे. दिवाळी लोकांच्या निष्काळजीपणामुळे आणि बाजारातील गर्दीमुळे रुग्णसंख्या वाढ होत असल्याचं आता दिसून येत आहेत. गुजरातमध्ये ४२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. संपूर्ण गुजरातमध्ये दिवसामागे रुग्णवाढ १० हून कमी झाली होती. पण आता एका दिवसात ४० च्यावर रुग्ण आढळून येऊ लागले आहेत.
कोणकोणत्या राज्यात किती रुग्ण?
कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी मृत्यूंची संख्या चिंतेचा विषय ठरत आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ९९७ रुग्ण आढळून आले आहेत. तर २८ जणांचा मृत्यू झाला आहे. छत्तीसगडमध्ये गेल्या २४ तासांत २६ रुग्ण आढळून आले आहेत. राजधानी दिल्लीत गेल्या २४ तासांत ४० रुग्ण आढळून आले आहेत.