CoronaVirus: कोरोनाविरोधातील लढाईत भारतातील या राज्यांनी घेतली आघाडी, काही ठिकाणी रुग्णांची संख्या शुन्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 09:46 AM2020-05-01T09:46:59+5:302020-05-01T09:51:45+5:30

देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ३५ हजारांच्या जवळ पोहोचला आहे. मात्र अशा परिस्थितीतही देशातील काही राज्यांनी कोरोनाला रोखण्याच्या मोहिमेत आघाडी घेतली आहे.

CoronaVirus: Indian states take lead in fight against corona, number of patients zero in some places BKP | CoronaVirus: कोरोनाविरोधातील लढाईत भारतातील या राज्यांनी घेतली आघाडी, काही ठिकाणी रुग्णांची संख्या शुन्यावर

CoronaVirus: कोरोनाविरोधातील लढाईत भारतातील या राज्यांनी घेतली आघाडी, काही ठिकाणी रुग्णांची संख्या शुन्यावर

Next
ठळक मुद्देतेलंगणा, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ आणि हरियाणा या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढीचा दर ३ टक्क्यांहून कमी आहेपूर्वोत्तर भारतात कोरोनाचे रुग्ण वाढीचा दर जवळपास शुन्यावर पोहोचला आहे.राष्ट्रीय स्तरावरही कोरोना रुग्णांच्या वाढीसाठी लागणारा कालावधी १४ दिवसांवर पोहोचला आहे.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या फैलाव दिवसेंदिवस गंभीर रूप घेत चालला आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ३५ हजारांच्या जवळ पोहोचला आहे. मात्र अशा परिस्थितीतही देशातील काही राज्यांनी कोरोनाला रोखण्याच्या मोहिमेत आघाडी घेतली आहे. तसेच काही राज्यांमध्ये तर आजच्या घडीला कोरोनाचा एकही रुग्ण  नाही. कोरोनाला रोखण्याच्या मोहिमेत दक्षिणेकडील आणि पूर्वोत्तर भारतातील राज्यांनी लक्षणीय आघाडी घेतली आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार तेलंगणा, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ आणि हरियाणा या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढीचा दर ३ टक्क्यांहून कमी आहे. या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्यासाठी लागणारा काळ २० दिवसांवर पोहोचला आहे. तर पूर्वोत्तर भारतात हा दर जवळपास शुन्यावर पोहोचला आहे. तसेच राष्ट्रीय स्तरावरही कोरोना रुग्णांच्या वाढीसाठी लागणारा कालावधी १४ दिवसांवर पोहोचला आहे.

गेल्या १० दिवसांचा विचार केल्यास कर्नाटक आणि केरळमध्ये कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्यासाठी लागणारा कालावधी ३६ दिवसांवर पोहेचला आहे. तर हरियाणामध्ये कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्यासाठी ३५ दिवस लागले आहेत. तर उत्तर प्रदेशात कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्यास २४ दिवस लागले आहेत.

राजस्थान, जम्मू-काश्मीर आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाम जास्त असले तरी आता हे प्रमाण हळूहळू कमी होत चालले आहे. या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्यासाठी लागणारा कालावधी १८ दिवसांवर पोहोचले आहे. तर तामिळनाडू, पश्चिम बंगाल पंजाब आणि गुजरातमध्ये रुग्णसंख्या दुप्पच होण्यासाठी लागणारा कालावधी १४ दिवसांवर पोहोचला आहे.

सकारात्मक बाब म्हणजे मणिपूर, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा आणि गोवा या राज्यांमध्ये आजच्या घडीला कोरोनाचा एकही रुग्ण नाही आहे. या राज्यांमधील सर्व कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सिक्कीम, नागालँड, दमण-दीव आणि लक्षद्विप येथे कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही.

सद्यस्थितीत भारताता कोरोनाचे ३५ हजार ६१० रुग्ण आहेत. त्यापैकी ८ हजार ३७३ रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत १ हजार ७५ रुग्णांता मृत्यू झाला आहे.

 

Web Title: CoronaVirus: Indian states take lead in fight against corona, number of patients zero in some places BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.