coronavirus: कोरोनाविरोधात भारताला मोठं यश, वर्षअखेरीस येणार लस, आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 11:13 PM2020-08-22T23:13:46+5:302020-08-22T23:44:36+5:30
देशात दररोज सुमारे ६० हजारहून अधिक रुग्ण सापडत असल्याने आयोग्ययंत्रणेची चिंता वाढत आहे. कोरोनावर मात करण्यासाटी जगातील इतर देशांप्रमाणे भारतातही लस विकसित करण्यासाठी यु्द्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या भारतात गंभीर संकट निर्माण झालेले आहे. दररोज सुमारे ६० हजारहून अधिक रुग्ण सापडत असल्याने आयोग्ययंत्रणेची चिंता वाढत आहे. कोरोनावर मात करण्यासाटी जगातील इतर देशांप्रमाणे भारतातही लस विकसित करण्यासाठी यु्द्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, भारतात विकसित होत असलेल्या कोरोना लसीबाबत देशाचे आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी मोठी घोषणा केली आहे.
याबाबत माहिती देताना हर्षवर्धन म्हणाले की, आमच्याकडून विकसित करण्यात येत असलेल्या कोरोनाच्या लसींपैकी एक लस संशोधनाच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचली आहे. ही लस या वर्षअखेरीस पूर्णपणे विकसित होईल, असा विश्वास आम्हाला आहे.
One of our COVID-19 vaccine candidates is in the third phase of the clinical trial. We are very confident that a vaccine will be developed by end of this year: Union Health Minister Harsh Vardhan https://t.co/saLgWS9uL7
— ANI (@ANI) August 22, 2020
दरम्यान, आज रात्री देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने तीस लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तर शनिवारी सकाळच्या आकडेवारीनुसार देशात ६९ हजारांहून अधिक रुग्ण सापडले होते. शनिवारी सकाळी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार देशातील कोरोना रुग्णांची संख्या २९ लाख ७५ हजार ७०१ एवढी होती. आज संध्याकाळपर्यंत हा आकडा ३० लाखांच्या पार गेला आहे. तर जगभरात आतापर्यंत कोरोनाचे २ कोटी २६ लाख रुग्ण सापडले असून, तब्बल ७ लाख ९३ हजार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी तयार झालंय खास एअर इंडिया वन विमान, अशी आहेत वैशिष्ट्ये
ताशी १८० किमी वेग, उशीर झाल्यास नुकसान भरपाई; अशा असतील देशातील खासगी ट्रेनमधील सुविधा
केवळ ३८ जणांवर चाचणी, अनेक साइड इफेक्ट्स, असं आहे रशियाच्या कोरोनावरील लसीचं वास्तव
आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता
वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती
टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश
अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस
घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी