CoronaVirus धक्कादायक! भारतासाठी येणारे टेस्टिंग किटचे जहाज अमेरिकेला पाठविले; WHO वर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 10:34 AM2020-04-14T10:34:59+5:302020-04-14T10:44:06+5:30
चीनहून भारतात येणारी रॅपिड अँटी बॉडी टेस्ट किट्सची मोठी ऑर्डर अमेरिकेकडे वळविण्यात आली आहे.
नवी दिल्ली : कोरोनाने जगाला विळखा घातला असून चीन, अमेरिकेसह अनेक देशांमध्ये पीपीई किट, टेस्टिंग कीट आणि औषधांची कमतरता मोठ्या प्रमाणावर भासू लागली आहे. यामुळे एका देशाकडे जाणारे साहित्या दुसराच देश मधूनच पळवू लागला आहे. भारतासोबतच असा धक्कादायक प्रकार घडला आहे. महत्वाचे म्हणजे भारताकडे औषधांची भीक मागणाऱ्या अमेरिकेने हे केले आहे. यावर डब्ल्यूएचओ स्पष्टीकरण दिले आहे.
तामिळनाडूच्या मुख्य सचिवांनी आरोप केला आहे की, चीनहून भारतात येणारी रॅपिड अँटी बॉडी टेस्ट किट्सची मोठी ऑर्डर अमेरिकेकडे वळविण्यात आली आहे. या वादावर डब्ल्यूएचओने सांगितले की या बाबत भारत सरकारकडून कोणत्याही प्रकारचा संपर्क साधण्यात आला नाहीय. तर दुसरीकडे भारताला शिस्त पाळण्याचा इशारा दिला आहे.
डॉ. माइक रेयान यांनी आजतक या वृत्तवाहिनीला सांगितले की, माझ्या माहितीनुसार आम्हाला अशी कोणतीही सूचना मिळालेली नाही. मात्र, मेडिकल पुरवठ्यावर दबाव आहे, अशा परिस्थितीमध्ये सर्वांनीच शिस्त दाखविली पाहिजे. गरज असलेल्या देशांना योग्य प्रमाणात मेडिकल किट्सचा पुरवठा व्हावा यासाठी प्रयत्न करत आहोत. तर डब्ल्यूएचओचे संचालक डॉ टेड्रोस यांनीही जगात टेस्टिंग किटची कमतरता असल्याचे मान्य केला आहे.
काय आहे प्रकरण?
भारताने चीनकडे २८ मार्चला ५ लाख रॅपिड अँटी बॉडी टेस्ट किट्सची मागणी नोंदविली होती. हे किट्स एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात येणार होते. मात्र, अद्याप हे किट्स पोहोचलेल नाहीत. यावर तामिळनाडूच्या मुख्य सचिवांनी आरोप केला होता की, चीनकडून जे किट्स भारताला मिळणार होते ते अमेरिकेला पाठविण्यात आले आहेत. यावर मात्र, डब्ल्यूएचओने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदींआधीच सोनिया गांधींचा देशवासियांना संदेश
धक्कादायक! जितेंद्र आव्हाडांना तीन दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण; नगरसेवकाचा दावा