CoronaVirus : IPS अधिकारी बनला देवदूत, मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले 78 रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 03:49 PM2021-04-24T15:49:47+5:302021-04-24T15:51:57+5:30
रुग्णालय प्रशासनाच्या एका ट्विटनंतर, समोर आले ओडिशात तैनात असलेले वरिष्ठ आयपीएस अधिकारी अरुण बोथरा... (IPS Arun Bothra)
नवी दिल्ली - देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस कोरोना संकट वाढतच चाले आहे. अशात रुग्णांना सर्वाधिक गरज भासतेय ती ऑक्सिजनची. मागणी वाढल्याने देशभरातील रुग्णालयांत ऑक्सिजनचाही तुडवडा निर्माण झाला आहे. यामुळे रुग्णालय प्रशासन शक्य त्या ठिकाणी ऑक्सिजनची मागणी करत आहे. नुकतीच दिल्लीतील राठी रुग्णालयातही अशीच परिस्थिती बघायला मिळाली. या रुग्णालयांत केवळ एक तास पुरेल एवढाच ऑक्सिजन शिल्लक होता. अशा परिस्थितीत एका आयपीएस अधिकाऱ्याने या रुग्णालयाला ऑक्सिजन पुरवठा करण्याची जबाबदारी घेतली. या आयपीएस अधिकाऱ्याचे नाव आहे अरुण बोथरा. (CoronaVirus IPS Arun Bothra arranges oxygen cylinders for 78 patients in delhi Rathi Hospital)
रुग्णालयाच्या विनंतीवर समोर आले आयपीएस -
सर्व प्रयत्न केल्यानंतर अखेर रुग्णालय प्रशासनाने अरविंद केजरीवाल, आरोग्यमंत्री हर्षवर्धन आणि पंतप्रधान यांना मेंशन करत एक ट्विट केले, की आमच्या रुग्णालयाला ऑक्सीजन सप्लाय होत नाहीय. यामुळे दाखल 78 रुग्णांच्या उपचारात अडथळा येत आहे. आम्ही सकाळपासूनच कॉल करत आहोत, मात्र, कुठल्याही हेल्पलाइन नंबरवर आमच्या कॉलला उत्तर मिळत नाही. आम्ही फोन करत आहोत, पण ते फोन कट करत आहेत. कृपया ही पोस्ट अधिकाधिक शेअर करा.'
रुग्णालय प्रशासनाच्या ट्विटनंतर, ओडिशात तैनात असलेले वरिष्ठ आयपीएस अधिकारी अरुण बोथरा मदतीसाठी समोर आले. रुग्णालयाच्या ट्विटला कोट करत त्यांनी लिहिले, ‘पुन्हा एकदा राठी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. रात्री 2 वाजेपर्यंत त्यांच्याकडे केवळ 1 तासांचाच ऑक्सीजन शिल्लक आहे. 68 रुग्णांचा जीव धोक्यात आहे. यावेळी कुणी मदत करू शकते का? कृपया हे पुढे पाठवा आणि आपण जशी शक्य आहे तशी मदत करा.’
Serious crisis of oxygen at @HospitalRathi once again. At 2 AM they have supply for just one hour. Life of 68 patients at stake.
— Arun Bothra (@arunbothra) April 22, 2021
Is there anyone who can help them at this hour? Pl amplify and do whatever you can. https://t.co/xH6768nor2
अरुण बोथरा यांच्या ट्विटनंतर अनेक लोक मदतीसाठी समोर आले. त्यांच्या ट्विटनंतर, या प्रकरणाची सर्वप्रथम दखल घेतली, ती वरिष्ठ आयएएस अधिकारी आणि गृह मंत्रालयात सचिव पदावर कार्यरत असलेल्या संजीव गुप्ता यांनी. यानंतर गुप्ता यांनी गृह मंत्रालयाच्या कंट्रोल रूमला अलर्ट केले. यासंदर्भात मुंडका आणि रनहोलाच्या एसएचओंसोबत चर्चा झाली. यानंतर दोन्ही अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांनंतर रुग्णालयासाठी 24 टाइप-डी ऑक्सिजन सिलेंडर आणि 14 टनांच्या एका ऑक्सीजन ट्रकची व्यवस्था झाली.
ऑक्सिजनची व्यवस्था झाल्यानंतर राठी रुग्णालय प्रशासनाने आयपीएस अरुण बोथरा यांचे आभार मानत, गेल्या 6 तासांपासून अडकलेले आमचे ऑक्सीजन सिलेंडर रिलीझ करण्यासाठी मदद केल्याबद्दल आभार अरुण सर, असे ट्विट केले आहे.
CoronaVirus : शरीरातील ऑक्सीजन स्तर कमी होऊ लागला, तर करा 'हा' उपाय; आरोग्य मंत्रालयानं दिलीय माहिती
नेहमीच गरजूंच्या मदतीसाठी धावून जातात आयपीएस अरुण -
अरुण बोथरा हे 1996 बॅचचे ओडिशा कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते नेहमीच गरजूंना मदत करत असतात. गेल्या वर्षीच्या लॉकडाउनमध्येही त्यांनी स्वतः प्रयत्न करून एका तरुणाचा जीव वाचवला होता. तेव्हा, एका महिलेने पंतप्रधान मोदींना टॅग करत मुलासाठी सांडणीच्या दूधाची मागणी केली होती. या महिलेच्या मुलाला ऑटिझमचा आजार होता. अशा वेळी मुलांना सांडणीचे दूध दिले जाते. मात्र, लॉकडाउनमुळे दुधाची व्यवस्था करता येणे अवघड होते. दूध मिळत नसल्याने मुलाची प्रकृती बिघडत चालली होती. ही गोष्ट जेव्हा अरुण बोथरा यांना समजली, तेव्हा त्यानी राजस्थानात सांडणीच्या 20 लिटर दुधाची व्यवस्था केली होती. यानंतर हे दूध रेल्वेच्या सहाय्याने मुंबईला संबंधित मुलाच्या आईपर्यंत पोहोचविण्यात आले.
याच प्रकारे यापूर्वी, अरूण यांनी एका 12 वर्षांच्या मुलाचीही त्याच्या आई-वडिलांशी भेट घालून दिली होती. हा मुलगा दिल्लीतील द्वारका भाकातील एका पार्कमध्ये आढळून आला होता.
पास की एक महिला योगिता ने कुत्तों को खाना देते वक़्त बच्चे को देखा। उन्होंने हफ्तों तक उसे भोजन दिया। बच्चे की हालत देख कर @sneha37891894 ने एक ट्वीट कर @indiacares को टैग किया।https://t.co/2FShRgbMi7
— Arun Bothra (@arunbothra) May 23, 2020
हमें पता लगा कि दिल्ली के लिए रेलगाड़ी पटना से है पर परिवार समस्तीपुर में था। pic.twitter.com/Tl56Jb55CU
कोरोना काळात अचानक पैशांची गरज पडली तर! जाणून घ्या, कुठून होऊ शकते तत्काळ व्यवस्था?