Coronavirus: 'जान भी है और जहान भी'; संकटकाळात भारतीयांना मोदींचा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 06:38 PM2020-04-11T18:38:30+5:302020-04-11T18:54:48+5:30

राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची संवाद साधताना त्यांनी आतापर्यंत आपण "जान है, तो जहान है" असे म्हणत होतो.

Coronavirus: 'Jaan Bhi, Jahaan Bhi': PM Says India Should Focus on Both Aspects in COVID-19 Fight, with Future in Mind vrd | Coronavirus: 'जान भी है और जहान भी'; संकटकाळात भारतीयांना मोदींचा दिलासा

Coronavirus: 'जान भी है और जहान भी'; संकटकाळात भारतीयांना मोदींचा दिलासा

Next

नवी दिल्ली: कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे मोदींनी देशात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी आज १४ एप्रिलनंतर लॉकडाऊन वाढवायचं की नाही, यासंदर्भात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून मतं जाणून घेतली. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची संवाद साधताना त्यांनी आतापर्यंत आपण "जान है, तो जहान है" असे म्हणत होतो.

आता पुढच्या काळात आपल्याला " जान भी है और जहान  भी है" या तत्त्वावर या संकटात काम करायचे आहे, असा मूलमंत्र दिला आहे. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी, समृद्ध आणि निरोगी भारतासाठी हा नारा प्रत्यक्ष कृतीत आणण्याचं त्यांनी आवाहन केलं आहे. जेव्हा या दोन्ही बाबी लक्षात ठेवून प्रत्येक नागरिक आपले काम करेल आणि शासनाच्या निर्देशांचे पालन करेल तेव्हा कोरोनाविरुद्धचा आपला लढा आणखी मजबूत होणार असल्याचंही मोदी म्हणाले आहेत. 

लॉकडाऊनच्या बाबतीत अनेक मुख्यमंत्र्यांनी उपयुक्त सूचना केल्या आहेत, अनेक जण करीत आहेत. याबाबतीत आम्ही निश्चित दोन-तीन दिवसांत काय करायचे ते ठरवत आहोत, पण लॉकडाऊन वाढवावे लागले तरी या कालावधीतील नियोजन वेगळ्या पद्धतीने करावे लागेल. विशेषतः: जे मजूर, कामगार आहेत त्यांना हाताला काम कसे मिळेल ते पाहावे लागेल. उद्योगांशी बोलून ठरवावे लागेल. हा लढा प्रदीर्घ काळ चालणार आहे, त्यामुळे सरकारी कर्मचारी अधिकारी यांना काम करावे लागणार आहे. तृतीय, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत किती टक्के लोकांनी कामावर येण्याबाबत ठरवावे लागेल. पण अधिकाऱ्यांनी तर कामावर यावेच लागेल, असंही मोदींनी स्पष्ट केलं आहे. पुढील आर्थिक बाबतीत केंद्र व राज्यांनी मिळून एकत्रित नियोजन करावे लागेल. यातही आपण काही चांगल्या संधी शोधल्यास देश पुढील काळात एक नवी आर्थिक ताकद म्हणून पुढे येऊ शकतो, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. 

कोरोना रुग्णास प्रसंगी ऑक्सिजनची गरज असते. व्हेंटिलेटर तर नंतर येते, पण कोविड रुग्णालयात प्रत्येक बेडजवळ त्याला वेळीच ऑक्सिजन मिळाला तर उपयोग होईल. टेलिमेडिसिन तसेच मोबाईल क्लिनिक उपक्रम लगेच सुरू करा. कोरोनामुळे इतर साध्या आजाराच्या रुग्णांना उपचार मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. प्रत्येक कॉलनी, वसाहत यांच्यासाठी मोबाईल क्लिनिक नेले तर फायदा होईल. आता डॉक्टर्स देखील कुठल्याही कायदेशीर अडचणीशिवाय फोनवरून इतर साध्या रोगासाठी औषध सुचवू शकता अशी परवानगी आहे. आरोग्य सेतू मोबाईल एप अतिशय उपयुक्त असून तो सर्वांनी डाउनलोड करावा, त्याचा भविष्यात देखील उपयोग होणार आहे. भारतासारख्या देशात जिथे मोठी लोकसंख्या आहे तिथे कोरोना सारख्या रोगाचा मुकाबला करण्यासाठी मोबाईल तंत्रज्ञान उपयोगी ठरेल.

शेतकऱ्याला त्याचा शेतमाल सहजपणे ग्राहकांना विकता आला पाहिजे ते पहा. जिथे वेअर हाउसेस आहेत तिथून देखील शेतमाल विकता आला पाहिजे जेणे करून बाजारपेठांमध्ये गर्दी होणार नाही. कोरोनाचे संकट पुढील काळात कसे स्वरूप धारण  करेल ते सांगता येणार नाही.  त्यामुळे पॅरा मेडिकल कर्मचारी तयार ठेवा, त्यांना ऑनलाईन प्रशिक्षणाची सोय आरोग्य मंत्रालयाने केली आहे, निवृत्त सैनिकांना देखील सहभागी करून घ्या. कोरोनावर उपचारासाठी डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी काम करताहेत. त्यांच्यावर हल्ले केल्यास किंवा त्यांना त्रास दिल्यास सहन केले जाणार नाही. कठोर कारवाई करा . उत्तर-पूर्व किंवा जम्मू काश्मीरच्या विद्यार्थ्यांसमवेत देखील कुणीही वेडेवाकडे वागू नका, असंही मोदींनी सांगितलं आहे. 
 

Web Title: Coronavirus: 'Jaan Bhi, Jahaan Bhi': PM Says India Should Focus on Both Aspects in COVID-19 Fight, with Future in Mind vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.