Coronavirus : ...अन् आईच्या अंत्यसंस्कारासाठी जवानाने केला तब्बल तीन दिवस 1100 किलोमीटरचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 11:09 AM2020-04-13T11:09:46+5:302020-04-13T11:31:23+5:30

Coronavirus : आईच्या अंत्यसंस्कारासाठी एका जवानाला तब्बल तीन दिवस 1100 किलोमीटरचा प्रवास करावा लागल्याची घटना समोर आली आहे.

Coronavirus jawan hitchhikes 1100 km to reach village after mother death SSS | Coronavirus : ...अन् आईच्या अंत्यसंस्कारासाठी जवानाने केला तब्बल तीन दिवस 1100 किलोमीटरचा प्रवास

Coronavirus : ...अन् आईच्या अंत्यसंस्कारासाठी जवानाने केला तब्बल तीन दिवस 1100 किलोमीटरचा प्रवास

Next

रायपूर - कोरोनाच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. एक-दुसऱ्यापासून दूर राहणे, घराबाहेर न पडणे, घरातच राहणे, हा एकमेव मार्ग आहे. यात जराही निष्काळजीपणा केल्यास भारताला जबर किंमत मोजावी लागेल. त्याचा अंदाज बांधणेही कठीण आहे, असं कळकळीने सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात 21 दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. मोदींनी लोकांना जेथे आहात तेथेच राहण्याचे आवाहन केले आहे. कोरोनामुळे देशभरात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टी बंद आहे. मात्र याच दरम्यान एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आईच्या अंत्यसंस्कारासाठी एका जवानाला तब्बल तीन दिवस 1100 किलोमीटरचा प्रवास करावा लागल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष यादव असं जवानाचं नाव असून त्यांना आपल्या आईच्या अंत्यसंस्कारासाठी तब्बल तीन दिवस 1100 किलोमीटरचा प्रवास करावा लागला आहे. संतोष छत्तीसगड सशस्त्र दलात कार्यरत आहेत. कोरोनामुळे देशात लॉकडाऊन असतानाच त्यांच्या आईचे उत्तर प्रदेशमध्ये निधन झाले. मात्र लॉकडाऊनमध्ये रेल्वेसेवा बंद असल्याने जवानाला तीन दिवसांचा प्रवास करावा लागला. आईच्या अंत्यसंस्कारासाठी उत्तर प्रदेशातील सिखड या गावी पोहोचण्यासाठी 1100 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी त्यांना तीन दिवस लागले.


  
आईच्या निधनाची बातमी समजल्यानंतर संतोष यांनी ट्रक, मालगाडी आणि बोटीच्या मदतीने 1100 किलोमीटरचा प्रवास केला आणि तीन दिवसांनी ते आपल्या गावी पोहोचले. 'आईच्या निधनाची बातमी समजल्यानंतर अशा अवस्थेत मी वडिलांना एकटे सोडू शकत नव्हतो. माझा लहान भाऊ आणि विवाहित बहीण हे दोघेही मुंबईत राहतात. लॉकडाऊनमुळे ते दोघेही गावी पोहोचू शकणार नव्हते. त्यामुळे लवकरात लवकर मला गावाकडे जाणे गरजेचे होते. मात्र लॉकडाऊनमुळे मी तीन दिवसांनी पोहोचलो' अशी माहिती संतोष यांनी दिली आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

काही दिवसांपूर्वी लॉकडाऊनमुळे वाहतूक बंद असल्याने एका वडिलांवर आपल्या पाच वर्षाच्या मुलाचा मृतदेह हातात घेऊन 88 किलोमीटरची पायपीट करण्याची वेळ आली होती. आंध्रप्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात ही घटना घडली होती. मनोहर असं या 38 वर्षीय पित्याचं नाव असून ते रोजंदारीवर काम करतात. मनोहर यांचा पाच वर्षांचा मुलगा देवा हा अचानक आजारी पडला. देवाला उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान देवाची तब्येत आणखी बिघडली आणि मृत्यू झाला. मात्र याच दरम्यान लॉकडाऊनमुळे सर्व वाहतूक बंद होती. वाहतूक बंद असल्याने आपल्या पाच वर्षाच्या मुलाचा मृतदेह हातात घेऊन मनोहरने 88 किलोमीटरची पायपीट करत प्रवास केला. त्यानंतर चित्रावती नदीच्या किनाऱ्यावर आपल्या चिमुकल्यावर अंत्यसंस्कार केले होते.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : Google ची बातच न्यारी; आजचं Doodle लय भारी, जाणून घ्या खासियत

Coronavirus : चौथ्या दिवशीही सर्व रिपोर्ट निगेटिव्ह, 'या' राज्यात 4 दिवसांत एकही रुग्ण नाही कोरोना पॉझिटिव्ह

Coronavirus : पश्चिम उपनगरात कोरोनाग्रस्तांचा आकडा 361वर, मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वॉर्डात 71 रुग्ण

Coronavirus : कोरोनाचे थैमान! जगभरात कोरोनामुळे तब्बल 1,14,247 जणांचा मृत्यू, रुग्णांची संख्या 11,853,155 वर

 

Web Title: Coronavirus jawan hitchhikes 1100 km to reach village after mother death SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.