CoronaVirus News: मजुरांना रेल्वेनं नव्हे, चार्टर्ड विमानानं माघारी आणणार; 'या' राज्याकडून तयारी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 07:07 PM2020-05-21T19:07:53+5:302020-05-21T19:11:27+5:30

मुख्यमंत्र्यांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र; चार्टर्ड विमानांना परवानगी देण्याची मागणी

coronavirus Jharkhand Cm Demand Chartered Plane For Migrant Laborers kkg | CoronaVirus News: मजुरांना रेल्वेनं नव्हे, चार्टर्ड विमानानं माघारी आणणार; 'या' राज्याकडून तयारी सुरू

CoronaVirus News: मजुरांना रेल्वेनं नव्हे, चार्टर्ड विमानानं माघारी आणणार; 'या' राज्याकडून तयारी सुरू

Next

रांची: लॉकडाऊनमुळे देशभरात अडकलेल्या मजुरांचे प्रचंड हाल सुरू आहेत. हाती काम नसल्यानं मजुरांसमोर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. उद्योगधंदे ठप्प असल्यानं मजुरांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मजुरांना त्यांच्या राज्यांमध्ये सोडण्यासाठी रेल्वेनं श्रमिक विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. मात्र तरीही मजुरांचे हाल संपत नाहीत. त्यामुळे झारखंड सरकारनं आता मोठा निर्णय घेतला आहे. 

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी लडाख, अंदमान आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये अडकलेल्या राज्यांमध्ये अडकून पडलेल्या मजुरांना माघारी आणण्यासाठी चार्टर्ड विमानं सुरू करण्याची परवानगी मागितली आहे. यासाठी सोरेन यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिलं आहे. लडाख, अंदमान आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये अडकलेल्या मजुरांना बस किंवा ट्रेनमधून राज्यात आणणं शक्य नसल्यानं चार्टर्ड विमानानं आणण्याची परवानगी द्या. ही परवानगी मिळाल्यास मजुरांना सुरक्षित घरी आणता येईल, अशी विनंती सोरेन यांनी शहांकडे केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परवानगीमुळे दीड लाख मजूर झारखंडमध्ये परतल्याची माहिती मुख्यमंत्री सोरेन यांनी पत्रात दिली आहे. लडाख, अंदमान आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये अडकलेल्या मजुरांना विमानानं परत आणण्यासाठी झारखंड सरकारनं १२ मे रोजी परवानगी मागितली होती. सध्या लडाखमध्ये २००, ईशान्येतील राज्यांमध्ये जवळपास ४५० मजूर अडकले आहेत. त्यांना बस किंवा रेल्वेच्या माध्यमातून परत आणणं अशक्य आहे. त्यामुळे त्यांना चार्टर्ड विमानानं सन्मानपूर्वक झारखंडमध्ये आणण्याची परवानगी द्या, असं सोरेन यांनी शहांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला, १ जवान शहीद; सीआरपीएफकडून सर्च ऑपरेशन सुरू

सीमेवर घुसखोरी! चीनविरोधात आता भारताला अमेरिकेची साथ

पीएम केअर फंडाविरोधात ट्विट करणं काँग्रेसला भोवलं; थेट सोनिया गांधींवर गुन्हा दाखल

तिकिटांचे दर निश्चित; देशांतर्गत विमान वाहतुकीसाठी सरकार सज्ज

Web Title: coronavirus Jharkhand Cm Demand Chartered Plane For Migrant Laborers kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.