Coronavirus : कनिका कपूर कोरोनाग्रस्तांना देऊ शकत नाही रक्त, 'हे' आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 05:33 PM2020-04-28T17:33:21+5:302020-04-28T17:44:43+5:30
Coronavirus : कनिकाने कोरोनाची लागण झाल्याचे लपवून गेल्या महिन्यात खळबळ उडवून दिली होती.
बॉलिवूड गायिका कनिका कपूरला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. कनिकाने कोरोनाची लागण झाल्याचे लपवून गेल्या महिन्यात खळबळ उडवून दिली होती. लंडनवरून भारतात परतल्यावर कनिकाने एक हायप्रोफाईल पार्टी सुद्धा अटेंड केली होती. ज्यात राजकीय वतुर्ळातील अनेक नेत्यांसह जवळपास 400 लोक सामील झाले होते. यानंतर कनिका कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट होताच सर्वच धास्तावले होते. निष्काळजीपणा बाळगून अनेकांचा जीव धोक्यात आणल्याबद्दल तिच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र आता कनिकाच्या कोरोनातून बरी झाली आहे.
दिल्लीमध्ये प्लाझ्मा थेरपी कोरोनावर प्रभावी ठरली. तेथील चार रुग्ण ठणठणीत बरे झाले. यामुळे कनिकानेही कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी तिचा प्लाझ्मा देणार असल्याचे सरकारला कळविले होते. मात्र आता इच्छा असूनही कनिका कपूर कोरोना रुग्णांना आपलं रक्त देऊ शकत नाही, कारण तिच्या रक्तातील प्लाझ्मा हा कोरोना रुग्णांच्या कामी येणार नसल्याची माहिती आता समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केजीएमयूच्या ट्रान्सफ्युजन मेडिसीन विभागाने प्लाझ्मा तपासणीसाठी कनिकाच्या रक्ताचे नमुने घेतले होते.
Coronavirus : आनंदाची बातमी! देशातील तब्बल 80 जिल्ह्यांत 7 दिवसांपासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाहीhttps://t.co/SXBIhXsSk4#CoronaUpdatesInIndia#COVID2019india
— Lokmat (@MiLOKMAT) April 28, 2020
केजीएमयूच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कनिका कपूरच्या शरीरातील अँटिबॉडीज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचारासाठी फायदेशीर नाहीत. कनिका हायग्रेड कोरोना पॉझिटिव्ह नव्हती त्यामुळे तिच्या प्लाझ्मातील अँटिबॉडीजही कमजोर आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहेत. कनिकाने परदेशातून परतल्यानंतर आयसोलेशनमध्ये न राहता काही पार्टींना हजेरी लावली होती. त्यामुळे कनिका विरोधात लखनऊमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली. कनिकाविरोधात कलम 188, 269 आणि 270 च्या अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आता लखनऊचे पोलिस कमिश्नर सुजीत पांडे यांनी कनिकाची याबाबत चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Coronavirus : कोरोनाविरोधातील लढाईत आशेचा किरण, देशात 'ही' औषधं देत आहेत व्हायरसला टक्करhttps://t.co/GBhN8x4d1T#coronaupdatesindia#Covid19India
— Lokmat (@MiLOKMAT) April 28, 2020
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : धक्कादायक! कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या प्रसिद्ध डॉक्टरची आत्महत्या
Coronavirus : आनंदाची बातमी! देशातील तब्बल 80 जिल्ह्यांत 7 दिवसांपासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही
Coronavirus : कोरोनाविरोधातील लढाईत आशेचा किरण, देशात 'ही' औषधं देत आहेत व्हायरसला टक्कर