Coronavirus : जीवनावश्यक वस्तूंची होम डिलिव्हरी, 'या' सरकारची नवी हेल्पलाईन सेवा लय भारी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 10:18 AM2020-04-22T10:18:51+5:302020-04-22T10:19:08+5:30
Coronavirus : लॉकडाऊनमध्ये लोकांना अन्नधान्यासाठी, जीवनावश्यक वस्तूंसाठी कोणत्याही समस्येचा सामना करावा लागून नये यासाठी कर्नाटक सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली - भारतातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असून आतापर्यंत 600 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही 19,000 वर पोहोचली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. याच दरम्यान जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात आली आहेत. मात्र इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाऊनमध्ये लोकांना अन्नधान्यासाठी, जीवनावश्यक वस्तूंसाठी कोणत्याही समस्येचा सामना करावा लागून नये यासाठी कर्नाटक सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
लॉकडाऊनमध्ये जास्तीतजास्त लोकांनी घरी राहावे आणि किराणा सामानाच्या खरेदीसाठी गर्दी करू नये या उद्देशाने कर्नाटक सरकारने एक नवी हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. या हेल्पलाईन सेवेच्या माध्यमातून नागरिकांनी फोनवरून यादी पाठवल्यास किराणा सामान घरी आणून दिलं जाणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी मंगळवारी (21 एप्रिल) हेल्पलाईन सेवेचे उद्घाटन केले आहे. यामध्ये व्हॉट्सअॅपवर किराणा मालाची यादी पाठवल्यास सामान घरपोच दिले जाईल. कर्नाटक सरकारने यासाठी 080-61914960 हा क्रमांक जारी केला आहे.
No need to step out for groceries, veggies or medicines during this #lockdown! CM @BSYBJP today inaugurated a home delivery helpline introduced by #BBMP & Karnataka State Disaster Management Authority. Follow the steps illustrated in the accompanying graphic to order.#Bengalurupic.twitter.com/I7mUsNVa2l
— B.H.Anil Kumar,IAS (@BBMPCOMM) April 21, 2020
'हेल्पलाईन सेवेमुळे कमीत कमी लोक घराबाहेर पडतील अशी आम्हाला आशा आहे. लोकांनी घरीच थांबावे असे आम्ही त्यांना आवाहन करतो' असं येडियुरप्पा यांनी म्हटलं आहे. तसेच राज्य सरकारने सेवा पुरवण्यासाठी जवळजवळ पाच हजार डिलेव्हरी एजंटशी करार केला असून या माध्यमातून लोकांना घरीच सामान पोहचवले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. बृहत बंगळूरू महानगर पालिकेचा (बीबीपीएम) हा उपक्रम होता. बंगळुरु दक्षिणचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी या सेवेसंदर्भातील माहिती राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिली. तसेच यामुळे आपल्या मतदारसंघातील लोकांना फायदा झाल्याचेही सूर्या यांनी सांगितले. कशाप्रकारे घर बसल्या सामान मागवता येईल याबद्दलही बीबीपीएमने माहिती दिली आहे.
Coronavirus : देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला, रुग्णांची संख्या 19,984 वर, 640 जणांचा मृत्यूhttps://t.co/Nf1hSPRkPb#coronaupdatesindia#coronavirusinindia
— Lokmat (@MiLOKMAT) April 22, 2020
जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 25 लाखांवर पोहोचली असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतासह अनेक देशांनी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून हा आकडा आता तब्बल 19 हजारांवर गेला असल्याची माहिती मिळत आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 19 हजार 984 वर पोहचली आहे. तर 640 जणांचा मृत्यू झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला, रुग्णांची संख्या 19,984 वर, 640 जणांचा मृत्यू
Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा
CoronaVirus: जगाचा आकडा २५ लाखांवर; राज्यात एकूण ५,२१८ रुग्ण
CoronaVirus: निर्बंध उठवण्याची घाई ठरेल घातक; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा