CoronaVirus : कोरोना झाल्याच्या संशयातून त्यानं केली आत्महत्या; कुटुंबीयांसाठी सुसाइड नोट लिहिल्यानं खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 12:37 PM2020-03-26T12:37:52+5:302020-03-26T19:15:00+5:30

गळफास घेण्यापूर्वी त्यानं एक चिठ्ठी लिहिली होती, ती आता सापडली आहे. त्या चिठ्ठीत त्यानं मी कोरोना व्हायरस संक्रमित आहे. त्यामुळे आत्महत्या करत आहे.

CoronaVirus : karnataka man kills self over fears he had contracted coronavirus asks family to get tested in letter vrd | CoronaVirus : कोरोना झाल्याच्या संशयातून त्यानं केली आत्महत्या; कुटुंबीयांसाठी सुसाइड नोट लिहिल्यानं खळबळ

CoronaVirus : कोरोना झाल्याच्या संशयातून त्यानं केली आत्महत्या; कुटुंबीयांसाठी सुसाइड नोट लिहिल्यानं खळबळ

googlenewsNext

उडुपीः कोरोना व्हायरसनं जगभरात खळबळ माजवली आहे. भारतातही कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या लागोपाठ वाढताना दिसत आहे. अनेक जण कोरोनाच्या भीतीपायी घरातच नजरकैद झाले आहेत. कर्नाटकातूनही अशीच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका ५७ वर्षीय व्यक्तीनं कोरोनाच्या भीतीपायी आत्महत्या केली आहे. स्वतः गळफास घेऊन त्यानं आपली जीवनयात्रा संपवली आहे. त्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचा संशय होता. गळफास घेण्यापूर्वी त्यानं एक चिठ्ठी लिहिली होती, ती आता सापडली आहे. त्या चिठ्ठीत त्यानं मी कोरोना व्हायरस संक्रमित आहे. त्यामुळे आत्महत्या करत आहे.

तसेच कुटुंबीयांनीसुद्धा आपली तपासणी करून घ्यावी. कर्नाटकातल्या उडुपीच्या व्यक्तीचा घराच्या बाहेर मृतदेह झाडावर लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. ज्यांना घरातचं होम क्वारंटाइन करण्यास सांगितलं होतं, त्यातही या व्यक्तीचं नाव नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तसेच त्या व्यक्तीमध्ये कोणत्याही प्रकारची कोरोना व्हायरसची लक्षण आढळून आलेली नव्हती. त्या व्यक्तीला पत्नी आणि दोन मुलं आहेत. सध्या कोरोना व्हायरसच्या संशयापायी आत्महत्या केलेल्या व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. 
भारतातही कोरोना व्हायरसनं मृत्यू झालेल्यांची संख्या १५ झाली असून, जवळपास ६००हून अधिक लोक संक्रमित झाले आहेत. महाराष्ट्रातल्या नवी मुंबईतल्या वाशी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ही महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याने राज्या कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या चार झाली आहे.  महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्थांची संख्या सातत्याने वाढत आहे. काल सांगली, मुंबई, पनवेल आदी भागात कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोनाच्या रुगणांचा आकडा १२४वर पोहोचला आहे.
 

Web Title: CoronaVirus : karnataka man kills self over fears he had contracted coronavirus asks family to get tested in letter vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.