coronavirus : कोरोनाविरोधात सर्वजण एकत्र येऊन लढूया, मोदींचे राज्य सरकारांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 02:30 PM2020-04-02T14:30:39+5:302020-04-02T16:41:05+5:30

केंद्र सरकार राज्यांसोबत उभे असून, राज्यांना सर्व प्रकारची मदत दिली जाईल

coronavirus: Let us all fight together against Corona virus, Narendra Modi appeals to all state governments BKP | coronavirus : कोरोनाविरोधात सर्वजण एकत्र येऊन लढूया, मोदींचे राज्य सरकारांना आवाहन

coronavirus : कोरोनाविरोधात सर्वजण एकत्र येऊन लढूया, मोदींचे राज्य सरकारांना आवाहन

Next

नवी -  देशात वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून सुरू असलेल्या प्रयत्नांबाबत चर्चा केली. तसेच पंतप्रधानांनी यावेळी काही सल्लेही दिले. कोरोनाच्या आपत्तीविरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढण्याचे आवाहन मोदींनी केले. तसेच केंद्र सरकार राज्यांसोबत उभे असून, राज्यांना सर्व प्रकारची मदत दिली जाईल,  असे आश्वासन मोदींनी दिले.

मुखमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील लॉकडाऊनच्या स्थितीविषयी चिंता व्यक्त केली. राज्यांनी जनतेकडून लॉकडाऊनची कठोरपणे पालन करून घ्यावे, अशी सूचना त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिली. तसेच लोकांना जीवनावश्यक वस्तूंची टंचाई भासणार नाही याची काळजी राज्यांनी घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी राज्य सरकारांना दिली.

यावेळी पंतप्रधान मोदींनी देशाच्या विविध भागातून मजुरांनी केलेल्या  पलायनाबाबत मोदींनी चिंता व्यक्त केली. तसेच मजुरांचे होत असलेले पलायन कुठल्याही परिस्थितीत रोखले गेले पाहिजे. त्यासाठी राज्यांनी शेल्टर होम आणि भोजनाची व्यवस्था करावी असेही मोदींनी सांगितले. 

तसेच कोरोनाच्या वाढत्या संख्येबाबतही मोदींनी चिंता व्यक्त केली. ज्या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे दिसतील, अशा व्यक्तींना आयसोलेशन वॉर्डमध्ये पाठवावे, तसेच आशा व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटीन करावे. क्वारंटीन वॉर्ड वाढवावे लागले तर वाढवावेत, अशी सक्त सूचनाही मोदींनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स मध्ये दिलेल्या सूचना 

१. लॉकडाऊन संपविल्यानंतर १५ एप्रिलला लगेच लोक रस्त्यावर येऊन गर्दी  करणार नाहीत याचे नियोजन प्रत्येक राज्याने करावे. टप्याटप्याने लोक, वसाहती, भाग सुरु होतील हे पाहावे

२. देशात आतापर्यंत आपण कोरोनाला रोखण्यासाठी करीत असलेले प्रयत्न यशस्वी होताहेत असे दिसते. पण खऱ्या अर्थाने आता लढाई सुरु झाली आहे. लॉकडाऊन संपले म्हणजे झाले असे नाही. आपल्याला सोशल डिस्टेनसिंग किंवा सामाजिक अंतर राखण्याचे प्रयत्न ठेवणे महत्वाचे आहे. त्यासाठी मास्क पाहिजे असे नाही. तर घरगुती चांगल्या कपड्याचा उपयोग होऊ शकतो. २१ दिवसांची तपस्या वाया जाऊ देऊ नका.
 
३. कोरोनाचा लढा सुरूच राहील. पण शांती, सद्भाव, एकता  राखणे महत्वाचे आहे. कायदा व सुव्यवस्था टिकून राहील हे पहा. त्यासाठी ड्रोन  वगैरे तंत्रज्ञांचा उपयोग करा.

४.  कोरोनाचा मुकाबला हा फक्त डॉक्टर करीत नाहीत. एनसीसी, स्वयंसेवी संस्थांचे तरुण तडफदार युवक यांनाही सहभागी करून घ्या.

५. निवृत्त अधिकारी, निवृत्त वैद्यकीय अधिकारी, समाजातील काहीतरी योगदान देऊ इच्छिणारे व्यक्ती, तज्ञ  यांचे टास्क फोर्स तयार करा. त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या द्या.

६. सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी उगाचच पॅकेजेसची घोषणा करू नका. हा लढा गांभीर्याने घ्यावयाचा आहे. सर्व राज्यांत यादृष्टीने संतुलन हवे. दोन चार दिवस वृत्तपत्रांत प्रसिद्धी मिळेल. पण कोरोनाचे संकट वास्तवात खूप मोठे आहे हे लक्षात ठेवा.

७. आता अनेक ठिकाणी पिकांची कापणी सुरु होईल. पण ग्रामीण भागात एकदम सर्व गर्दी होईल असे करू नका. त्याची विभागणी करा. शेतमाल मुख्य बाजारपेठेत आणण्यासाठी काही शेतकऱ्यांनी वाहन ठरविल्यास खर्चही वाचेल आणि अनावश्यक गर्दी होणार नाही.

८. पीएम गरीब कल्याण बँक खात्यातली रक्कम काढायला गर्दी होते आहे. तशी गर्दी होणार नाही याचे नियोजन करा.

९. सर्व राज्याचा एकत्रित मिळून ११ हजार कोटी रुपये केंद्राने राज्याला द्यावयाचा हिस्सा आम्ही लगेच देत आहोत.

१०. आयुष मंत्रालयाने त्यांच्या संकेतस्थळावर आपली प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी दिलेले उपाय जरूर करा.

११. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी मोठ्या प्रमाणावर लोक मरण पावतील असे म्हटले आहे. चीनमध्येही कोरोना संसर्गाची प्रकरणे  आढळताहेत. ऑक्टोबर नोव्हेंबरपासून आपल्याकडे थंडी सुरु होते. त्यामुळे विषाणूचा मुकाबला करण्याचे आव्हान आहे. 

 

Web Title: coronavirus: Let us all fight together against Corona virus, Narendra Modi appeals to all state governments BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.