CoronaVirus Live Updates : लस घेतल्यानंतर 'ही' लक्षणं आढळून आल्यास असू शकतो कोरोनाचा धोका; डॉक्टरांनी दिला मोलाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 03:04 PM2021-07-26T15:04:21+5:302021-07-26T15:12:37+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : देशात लसीकरण मोहीम सुरू आहे. लाखो लोकांनी कोरोना लस घेतली आहे. मात्र लस घेतल्यानंतर देखील अनेकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.
नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल तीन कोटींवर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 39,361 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 416 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,20,967 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. याच दरम्यान देशात लसीकरण मोहीम सुरू आहे. लाखो लोकांनी कोरोना लस घेतली आहे. मात्र लस घेतल्यानंतर देखील अनेकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.
निष्काळजीपणामुळे अनेकांना कोरोनाचा संसर्ग होत आहे. लस घेतल्यानंतरही कोणती लक्षणं आढळून येतात. यापासून कसा बचाव करायचा हे जाणून घेऊया. डॉक्टरांनी याबाबत मोलाचा सल्ला दिला आहे. कोरोना लस घेतल्यानंतर अनेकांना वाटतं संसर्ग होत नाही. मात्र असं काही नाही. लागण होऊ शकते. कोरोना लस घेणं अत्यंत गरजेचं असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतरही घशात खवखव होणं, वास न येणं, डोकेदुखी, शिंका येणं अशी काही लक्षणं आढळून येत असल्याचं दिसून येत आहेत. कोरोना लसीचा डोस घेतल्यानंतरही मास्क लावणं अत्यंत गरजेचं आहे.
Corona Vaccine : जगभरातील रुग्णांच्या संख्येने 19 कोटींचा टप्पा केला पार, लसीकरण मोहीम वेगाने सुरू#Corona#coronavirus#CoronaVirusUpdates#CoronaVaccine#CoronaVaccinationhttps://t.co/Qsrkvo6kxx
— Lokmat (@MiLOKMAT) July 26, 2021
घरी राहून स्वत:ची काळजी घ्या, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. सोशल डिस्टंसिंगचं पालन करा. आपले हात साबण आणि सॅनिटायझरच्या मदतीने नेहमी स्वच्छ करत राहा. बाहेरून घरी आल्यानंतर अंघोळ करा. सार्वजनिक ठिकाणी, दुकान, मॉल, ऑफिसमध्येही कोरोना नियमावलीचं पालन करा, लहान मुलांची विशेष काळजी घ्या असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. फायजर-बायोएनटेक लसीच्या दोन डोसमध्ये अधिक अंतर ठेवल्यास अँटीबॉडी आणि टी-सेल विकसित रोगप्रतिकारक शक्ती वाढणार असल्याचं ब्रिटीश संशोधकांनी म्हटलं आहे. रिसर्चमधून ही माहिती समोर आली आहे.
CoronaVirus Live Updates : भय इथले संपत नाही! कोरोनावर मात केली पण आरोग्यविषयक समस्यांनी चिंता वाढवली#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindiahttps://t.co/mHy87GLzNV
— Lokmat (@MiLOKMAT) July 25, 2021
कोरोना लसीच्या दोन डोसमध्ये नेमकं किती अंतर ठेवणं योग्य?; रिसर्चमधून करण्यात आला मोठा दावा
ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या नेतृत्वात बर्मिंघम, न्यू कॅसल, लिव्हरपूल आणि शेफिल्ड विद्यापीठांनी आणि ब्रिटन कोरोना व्हायरस इम्यूनोलॉजी कंसोर्टियमच्या मदतीने फायजर-बायोएनटेकच्या लसीबाबत सखोल संशोधन करण्यात आले. आरोग्य कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, टी सेल आणि अँटीबॉडीचा स्तर पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये अंतर ठेवले तरी अधिक असल्याचं संशोधकांना आढळून आले आहे. जागतिक पातळीवर करण्यात आलेल्या संशोधनानुसार, लसीचे दोन डोस घेण्याच्या दरम्यानच्या काळात कोरोनापासून बचाव होतो आणि लसीच्या दुसऱ्या डोसची आवश्यकता आहे. शेफील्ड विद्यापीठाच्या संसर्गजन्य आजाराचे वरिष्ठ चिकित्सा प्रवक्ते आणि प्रमुख संशोधक डॉ. तुषाण डी सिल्वा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्स-सीओव्ही-2 लसीनंतर अँटीबॉडी आणि टी-सेलचे आकलन या संशोधनात करण्यात आले. या संशोधनात 503 आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता.
CoronaVirus Live Updates : लहान मुलांना कोरोनाची लागण, पालकांमध्ये भीतीचे वातावरण; रिसर्चमधून दावा#coronavirus#CoronavirusPandemic#CoronavirusUpdates#Coronahttps://t.co/pl5NZliM4F
— Lokmat (@MiLOKMAT) July 23, 2021