CoronaVirus Live Updates : परिस्थिती गंभीर! ऑक्सिजन टँकर रस्ता चुकला अन् 7 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 11:02 AM2021-05-10T11:02:27+5:302021-05-10T11:03:55+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनामुळे आतापर्यंत दोन लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील अनेक रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहे.
नवी दिल्ली - देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 2,26,62,575 वर पोहोचला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत दोन लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील अनेक रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहे. मात्र याच दरम्यान ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक रुग्णालयांनी आपल्या रुग्णालयाबाहेर ऑक्सिजन तुटवडा असल्याची नोटीस लावली आहे. तसेच ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे दुसरीकडे रुग्णाला उपचारासाठी दाखल करा असं देखील सांगण्यात येत आहे. अशी परिस्थिती असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑक्सिजन अभावी कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
कोरोनामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून रुग्णांचा मृत्यू होत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. हैदराबादमध्ये ऑक्सिजन टँकर रस्ता चुकल्याने सात कोरोनाग्रस्तांना आपला जीव गमवावा लागला आहे. ऑक्सिजन मिळण्यास उशीर झाल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादमधील किंग कोटी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यातील सात रुग्णांची प्रकृती गंभीर होती. त्यांना तात्काळ ऑक्सिजनची गरज होती. मात्र ऑक्सिजनचा दाब कमी प्रमाणात झाल्याने रुग्णांनी प्राण सोडला.
CoronaVirus Live Updates : कोरोनाचे थैमान! गेल्या वर्षी 734 डॉक्टर्सचा मृत्यू; रुग्णांच्या संख्येने वाढवली चिंता#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindiahttps://t.co/rlmurxo5Di
— Lokmat (@MiLOKMAT) May 6, 2021
रुग्णालय प्रशासनाने रुग्णालयातील ऑक्सिजन टँकमधून कमी दाबाने पुरवठा होत असल्याची माहिती दिली होती. त्यामुळेच यासाठी ऑक्सिजनची व्यवस्थाही करण्यात आली. मात्र हा टँक भरण्यासाठी निघालेला टँकर रस्ता चुकला आणि ऑक्सिजन अभावी सात जणांचा मृत्यू झाला आहे. नारयानगुडा पोलिसांनी देखील रस्ता चुकलेल्या टँकरला रस्ता दाखवण्यासाठी प्रयत्नही केले. मात्र टँकर येईपर्यंत बराच उशीर झाला होता. या प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. टँकरला येण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर का तयार केला नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus Live Updates : "ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने कोरोना रुग्णांचा मृत्यू होणं आमच्यासाठी वेदनादायी"#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia#OxygenCylindershttps://t.co/DM2kaC3D6Vpic.twitter.com/BXyzJRFlOg
— Lokmat (@MiLOKMAT) May 5, 2021
"ऑक्सिजनअभावी होणारे मृत्यू नरसंहारापेक्षा कमी नाही"; हायकोर्टाकडून कानउघाडणी
ऑक्सिजन पुरवठ्यासाठी जबाबदारी असणाऱ्यांची अलाहाबाद उच्च न्यायालयाने चांगलीच कानउघाडणी केली आहे. देशातील विविध रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णालयात ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्णांचा मृत्यू होणं हे गुन्हेगारी कृत्य असून नरसंहारापेक्षा कमी नाही अशा शब्दांत उच्च न्यायालयाने सुनावलं आहे. न्यायमूर्ती सिद्धार्थ वर्मा आणि अजित कुमार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू होती. लखनऊ आणि मेरठमध्ये ऑक्सिजनअभावी होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूसंबंधी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टची दखल घेताना खंडपीठाने हे म्हटलं आहे.
CoronaVirus Live Updates : धक्कादायक! कोरोनामुळे भयंकर इन्फेक्शन; वेळेत उपचार झाले नाहीत तर रुग्णांना गमवावे लागताहेत डोळे #coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindiahttps://t.co/0winvlSqKe
— Lokmat (@MiLOKMAT) May 7, 2021
CoronaVirus Live Updates : "आम्ही बेडसाठी आणखी दोन तास वाट पाहू पण आमचा बेड या तरुणाला द्या"#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindiahttps://t.co/WgaClzqdNe
— Lokmat (@MiLOKMAT) May 8, 2021