CoronaVirus Live Updates : बापरे! जंगलचा राजा कोरोनाच्या विळख्यात; हैदराबादच्या प्राणीसंग्रहालयातील 8 सिंह पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 03:41 PM2021-05-04T15:41:29+5:302021-05-04T15:53:58+5:30

CoronaVirus Live Updates 8 Asiatic Lions Test Positive for Covid19 in Hyderabad : हैदराबादेतील नेहरू जूलॉजिकल पार्कमधील 8 आशियाई सिंहांना कोरोनाची लागण झाली आहे.

CoronaVirus Live Updates 8 asiatic lions test positive for covid19 in hyderabad zoo | CoronaVirus Live Updates : बापरे! जंगलचा राजा कोरोनाच्या विळख्यात; हैदराबादच्या प्राणीसंग्रहालयातील 8 सिंह पॉझिटिव्ह

CoronaVirus Live Updates : बापरे! जंगलचा राजा कोरोनाच्या विळख्यात; हैदराबादच्या प्राणीसंग्रहालयातील 8 सिंह पॉझिटिव्ह

googlenewsNext

नवी दिल्ली - कोरोनामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील रुग्णांची संख्या ही तब्बल दोन कोटींवर गेली आहे. याच दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्राण्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आली आहे. जंगलचा राजा कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. हैदराबादेतील नेहरू जूलॉजिकल पार्कमधील 8 आशियाई सिंहांना कोरोनाची लागण झाली आहे. द हिंदूच्या वृत्तानुसार नेहरू जूलॉजिकल पार्कमधील अधिकाऱ्यांनी याची पुष्टी केली आहे. RT-PCR चाचणी केल्यानंतर सिंह कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (CCMB)ने आतापर्यंत सँपल पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिलेली नाही.

रिपोर्टनुसार, CCMB या सँपलची जीनोम सिक्वेंसिंग पद्धतीने विस्तृत तपासणी करतील. त्या माध्यमातून सिंहांना माणसांपासून कोरोनाचा संसर्ग झाला आहे का? याचा तपास केला जाईल. इन्स्टिट्यूटच्या वैज्ञानिकांनी अधिकाऱ्यांना सावधगिरी बाळगण्यास सांगितलं आहे. त्याचबरोबर तातडीने कोरोना संसर्गित सिंहांवर उपचार सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. प्राणीसंग्रहलयातील अधिकाऱ्यांकडून सिंहांच्या फुफ्फुसाचा सिटी स्कॅन केला जाण्याची शक्यता आहे. जेणेकरुन त्यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाला आहे का याची माहिती मिळणार आहे.
 

एएनआय या वृत्तसंस्थेने नेहरू जूलॉजिकल पार्कच्या पीआरओनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाची लक्षणं दिसून आल्यानंतर प्राण्यांची RT-PCR चाचणी करण्यात आली. आम्ही अहवाल येण्याची वाट पाहत आहोत. डॉक्टर सिंहांच्या प्रकृतीचं परिक्षण करत आहेत, अशी माहिती दिली आहे. यापूर्वी अन्य देशात प्राण्यांना कोरोनाची लागण झाल्याचा प्रकार समोर आला होता. मात्र आता भारतात पहिल्यांदाच प्राण्यांना कोरोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

द हिंदूने सुत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे 24 एप्रिलला प्राणीसंग्रहालयातील केअरटेकर्सना सिंहांना कोरडा खोकला, नाक वाहणं आणि खाणं जात नसल्याची लक्षणं दिसून आली. त्यानंतर तातडीने पशुपालन अधिकाऱ्यांना त्याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर सिंहांचा स्वॅब घेण्यात आला आणि ते सीसीएमबीला पाठवण्यात आले. दरम्यान, कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आशिया खंडातील सर्वात मोठं प्राणीसंग्रहालय असलेलं नेहरू जूलॉजिकल पार्क पर्यटकांसाठी बंद करण्यात आलं आहे. प्राणी संग्रहालयातील 12 पेक्षा अधिक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

Read in English

Web Title: CoronaVirus Live Updates 8 asiatic lions test positive for covid19 in hyderabad zoo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.