धोका वाढला! 10 मधील 8 रुग्ण ओमायक्रॉनचे; एका दिवसात 27 हजार केस; 'या' राज्यात परिस्थिती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 05:12 PM2022-01-13T17:12:04+5:302022-01-13T17:13:52+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: डिसेंबरपासून कोरोना प्रकरणांचा वेग वाढू लागला असून जानेवारीमध्येही प्रकरणे आणखी वेगाने वाढत आहेत. 

CoronaVirus Live Updates 8 out of 10 covid cases in delhi are of omicron variant | धोका वाढला! 10 मधील 8 रुग्ण ओमायक्रॉनचे; एका दिवसात 27 हजार केस; 'या' राज्यात परिस्थिती गंभीर

धोका वाढला! 10 मधील 8 रुग्ण ओमायक्रॉनचे; एका दिवसात 27 हजार केस; 'या' राज्यात परिस्थिती गंभीर

Next

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तीन कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,47,417 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल साडे चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा 5,488 वर पोहोचला आहे. याच दरम्यान दिल्लीमध्येओमायक्रॉनचा कहर पाहायला मिळत आहे. 10 मधील 8 रुग्ण ओमायक्रॉनचे आढळून येत आहेत. तर एका दिवसात 27 हजार कोरोना केस समोर येत आहेत. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे. दिल्लीत डिसेंबरपासून कोरोना प्रकरणांचा वेग वाढू लागला असून जानेवारीमध्येही प्रकरणे आणखी वेगाने वाढत आहेत. 

तज्ञांच्या अंदाजानुसार, ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. रिपोर्टमधून हे समोर येत आहे. जवळपास 80 टक्के रुग्णांमध्ये ओमायक्रॉन आढळून आला आहे. दिल्लीतून डेल्टाचा धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही. अर्थात, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्याच्या तुलनेत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात डेल्टा प्रकरणांची टक्केवारी निम्म्यावर आली आहे, परंतु डेल्टा अजूनही आहे. एप्रिल-मेमध्ये डेल्टा प्रकाराचा कहर पाहायला मिळाला होता. डीडीएमएच्या शेवटच्या बैठकीत 1 ते 8 जानेवारीचा जीनोम चाचणी अहवाल ठेवण्यात आला होता. 

या आठवड्यात 511 नमुने तपासण्यात आले, त्यापैकी 402 (78.7 टक्के) मध्ये ओमायक्रॉन आढळला आहे. 89 नमुन्यांमध्ये (17.4%) डेल्टा प्रकाराची पुष्टी झाली आहे. तरीही कोरोचे इतर प्रकारही 3.9 टक्के नमुन्यांमध्ये आढळून आले आहेत. ज्यांना आतापर्यंत कोरोनाच्या कोणत्याही प्रकाराची लागण झालेली नाही त्यांच्यासाठी कोरोनाचे सर्व प्रकार धोक्यात आहेत. 25 ते 31 डिसेंबर 2021 दरम्यान, 863 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. यापैकी 433 म्हणजेच 50% मध्ये ओमायक्रॉन आढळून आला. तर डेल्टा प्रकार 293 नमुन्यांमध्ये (34 टक्के) आढळून आला. तर 16 टक्के नमुन्यांमध्ये इतर प्रकार आढळून आले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 ...आता सर्दी झाली तरी नो टेन्शन! कोरोना संसर्गापासून मिळू शकतं संरक्षण; रिसर्चमध्ये मोठा दावा

सर्दी झाली तरी आता घाबरण्याचं अथवा काळजी करण्याची गरज नाही. कारण सर्दीमुळे कोरोनापासून सुरक्षित राहता येतं अशी माहिती आता समोर आली आहे. कोरोना संसर्गापासून संरक्षण मिळू शकतं असा मोठा दावा रिसर्चमधून करण्यात आला आहे. सर्दीला प्रतिकार करण्यासाठी शरीरामध्ये निर्माण होणारे टी सेल्स हे कोरोना संसर्गचा धोका कमी करतात. सामान्यपणे सर्दीचा त्रास असणाऱ्यांना सार्क-सीओव्ही 2 चा संसर्ग होण्याची शक्यता कमी होते, असं ब्रिटनमधील एका रिसर्चमध्ये समोर आलं आहे. नेचर कम्युनिकेशन्स नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या रिसर्चमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार, टी सेल्समुळे निर्माण होणारी रोगप्रतिकारशक्तीचा पुरावा पहिल्यांदाच मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे.
 

Web Title: CoronaVirus Live Updates 8 out of 10 covid cases in delhi are of omicron variant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.