CoronaVirus Live Updates : धक्कादायक! भाजपा आमदाराचा कोरोनाने झाला मृत्यू; 24 तास मिळाला नव्हता ICU बेड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 08:33 PM2021-04-28T20:33:24+5:302021-04-28T20:36:21+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : भाजपा आमदाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सत्ताधारी पक्षातील आमदाराला 24 तास ICU बेड मिळाला नसल्याची माहिती मिळत आहे. 

CoronaVirus Live Updates bareilly bjp mla kesar singh gangwar dies from corona | CoronaVirus Live Updates : धक्कादायक! भाजपा आमदाराचा कोरोनाने झाला मृत्यू; 24 तास मिळाला नव्हता ICU बेड

CoronaVirus Live Updates : धक्कादायक! भाजपा आमदाराचा कोरोनाने झाला मृत्यू; 24 तास मिळाला नव्हता ICU बेड

Next

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,60,960 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 3293 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,01,187 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, होम आयसोलेशनच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. मात्र याच दरम्यान रुग्णालयात बेड्स आणि ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोनामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. एका भाजपा आमदाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सत्ताधारी पक्षातील आमदाराला 24 तास ICU बेड मिळाला नसल्याची माहिती मिळत आहे. 

उत्तर प्रदेशच्या (Uttar pradesh) बरेलीतील (bareilly) भाजपा आमदार केसर सिंह गंगवार (BJP Kesar Singh Gangwar) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 18 एप्रिलला गंगवार कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. सुरुवातीला त्यांना बरेलीच्या राममूर्ती मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण त्यांना 24 तासांपर्यंत एक आयसीयू बेड मिळाला नाही. काही दिवसांपूर्वीच त्यांना नोएडातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

यूपी भाजपाचे अध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी आमदार केसर सिंह यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेले हे सत्ताधारी भाजपाचे तिसरे आमदार आहे. याआधी औरेयातील आमदार रमेश दिवाकर आणि लखनऊ पश्चिमचे आमदार सुरेश श्रीवास्तव यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या काकी नर्मदाबेन मोदी (Narmadaben Modi) यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. गेल्या 10 दिवसांपासून अहमदाबादच्या एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काकी नर्मदाबेन यांचं कोरोनाने निधन

नर्मदाबेन मोदी या 80 वर्षांच्या होत्या. अहमदाबादमधील न्यू रानीप परिसरात त्या आपल्या मुलांसमवेत राहात होत्या. त्यांचे पती जगजीवनदास मोदी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वडील दामोदरदास मोदी यांचे सख्खे बंधू होते. जगजीवनदास यांचं अनेक वर्षांपूर्वी निधन झालं आहे. नरेंद्र मोदी यांचे लहान भाऊ प्रल्हाद मोदी यांनी याविषयी माहिती दिली आहे. नर्मदाबेन या दहा दिवसांपासून कोरोनाने आजारी होत्या आणि रुग्णालयात उपचार घेत होत्या असं म्हटलं आहे. 

Web Title: CoronaVirus Live Updates bareilly bjp mla kesar singh gangwar dies from corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.