CoronaVirus Live Updates : कोरोनाचा हाहाकार! आसाम आणि बंगालने वाढवलं टेन्शन; केंद्राने राज्यांना दिला गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 05:24 PM2021-10-31T17:24:51+5:302021-10-31T18:41:31+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: साप्ताहिक संसर्गाचे प्रमाण आणि चाचणीत झालेली घट लक्षात घेऊन केंद्राने राज्य सरकारांना इशारा दिला आहे.

CoronaVirus Live Updates centre to bengal and assam as virus positivity shows spike increase testing | CoronaVirus Live Updates : कोरोनाचा हाहाकार! आसाम आणि बंगालने वाढवलं टेन्शन; केंद्राने राज्यांना दिला गंभीर इशारा

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा हाहाकार! आसाम आणि बंगालने वाढवलं टेन्शन; केंद्राने राज्यांना दिला गंभीर इशारा

Next

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा 3,42,73,300 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 12,830 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 446 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,58,186 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान दोन राज्यांनी देशाचं टेन्शन वाढवलं आहे. आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये कोरोना उद्रेक पाहायला मिळत आहे. आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये वेगाने वाढणाऱ्या कोरोना प्रकरणांमुळे केंद्र सरकारची चिंता वाढली आहे. साप्ताहिक संसर्गाचे प्रमाण आणि चाचणीत झालेली घट लक्षात घेऊन केंद्राने राज्य सरकारांना इशारा दिला आहे.

कोविड मार्गदर्शक तत्त्वांच्या (चाचणी वाढवा, कोविड नियमांची अंमलबजावणी करा) काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यावर भर देताना त्यांनी या पॅरामीटर्सचे पुनरावलोकन करण्यास सांगितले आहे. 26 ऑक्टोबर रोजी आसाम आणि पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव आरती आहुजा यांनी गेल्या आठवड्यापासून (ऑक्टोबर 20-26) नवीन प्रकरणांमध्ये वाढ आणि संसर्गाच्या प्रकरणांकडे लक्ष वेधले. गेल्या चार आठवड्यांपासून ते 25 ऑक्‍टोबरपर्यंत रुग्णांचा आकडा वाढत आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी 22 ऑक्टोबर रोजी पश्चिम बंगालला पत्र लिहिले आणि या महिन्याच्या सुरुवातीला दुर्गा पूजेनंतर कोलकातामधील संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली. 

कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ 

आसामला लिहिलेल्या पत्रात आहुजा यांनी गेल्या आठवड्यापासून (ऑक्टोबर 20-26) साप्ताहिक नवीन प्रकरणांमध्ये 41% वाढ झाली आहे. गेल्या चार आठवड्यांपासून संसर्गाचा प्रसार वाढण्याची चिन्हेही आहेत. 28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान ते 1.89% होते, जे 19-25 ऑक्टोबर दरम्यान वाढून 2.22% झाले आहे असं म्हटलं आहे. त्याच वेळी 28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान राज्यात 1,64,071 नमुन्यांची तपासणी करण्यात आली, तर 19 ते 25 ऑक्टोबर दरम्यान 1,27,048 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असताना राज्याने तपास वाढवण्याची गरज आहे. 

केंद्राने राज्यांना दिला गंभीर इशारा

आसाममध्ये, बारपेटा आणि कामरूप मेट्रो जिल्हे कोविड-19 आणि साप्ताहिक संसर्गाच्या प्रकरणांमुळे चिंतेत आहेत. त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमधील कोलकाता आणि हावडा देखील मोठ्या संख्येने संसर्गामुळे चिंतेत असल्याचे सांगण्यात आले आहे. आहुजा यांनी पश्चिम बंगालमध्ये गेल्या आठवड्यापासून साप्ताहिक नवीन प्रकरणांमध्ये 41% वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात, 20-26 ऑक्टोबर दरम्यान 6,040 प्रकरणे नोंदवली गेली, तर 13-19 ऑक्टोबर दरम्यान 4,277 प्रकरणे नोंदवली गेली. त्याच वेळी, पश्चिम बंगालमध्ये, 28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान 2,62,319 नमुने तपासण्यात आले, तर 19-25 ऑक्टोबर दरम्यान 2,61,515 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

Web Title: CoronaVirus Live Updates centre to bengal and assam as virus positivity shows spike increase testing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.