CoronaVirus Live Updates : कडक सॅल्यूट! दागिने गहाण ठेवून दाम्पत्याने कोरोना रुग्णांसाठी दान केले 100 पंखे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 03:12 PM2021-04-29T15:12:33+5:302021-04-29T15:18:33+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनामुळे अनेकजण विविध समस्यांचा सामना करत आहेत. याच दरम्यान रुग्णालयात देखील गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
नवी दिल्ली - देशात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,79,257 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3645 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे अनेकजण विविध समस्यांचा सामना करत आहेत. याच दरम्यान रुग्णालयात देखील गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. बेड आणि ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. याच दरम्यान अनेक मंडळी मदतीसाठी पुढाकार घेत आहेत. गरजुंना मदतीचा हात देत आहेत. अशीच एक घटना तामिळनाडूमध्ये घडली आहे. एका दाम्पत्याने आपले दागिने गहाण ठेवून कोरोना रुग्णांसाठी 100 पंखे दिल्याची कौतुकास्पद घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंगनल्लूरच्या ईएसआय रुग्णालयात 600 बेडची सुविधा उपलब्ध आहे. याच रुग्णालयाच्या कोविड वॉर्डसाठी दाम्पत्याने 100 पंखे दान केले आहेत. विशेष म्हणजे या दाम्पत्याने रुग्णालय प्रशासनाला आपली ओळख सार्वजनिक करण्यास मनाई केली आहे. रुग्णालयात सर्व ठिकाणी एसी आहे. मात्र कोरोना रुग्णांसाठी असलेल्या वॉर्डमध्ये एसीचा वापर करण्यास मनाई आहे. पंखे उपलब्ध आहेत. मात्र रुग्णांची संख्या पाहता पंख्याची कमतरता भासत आहे. दागिने गहाण ठेवून 100 पंखे भेट दिलेल्या या दाम्पत्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.
CoronaVirus News : मुलाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मेहता दामप्त्याने 15 लाखांची केली होती FD पण...https://t.co/E7wttCTiuG#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia
— Lokmat (@MiLOKMAT) April 26, 2021
ईएसआय मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. रविंद्रन यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला आम्ही ही मदत स्वीकारण्यास तयार नव्हतो, परंतु देणगी घेतल्याशिवाय हे दाम्पत्य येथून जायलाच तयार नव्हतं. या दाम्पत्याने आपले 2 लाख 20 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने गहाण ठेवून शंभर पंखे विकत घेतले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनाच्या संकटात अनेकांनी आपली प्रिय, जवळची व्यक्ती गमावली आहे. मात्र कोरोनाच्या कठीण काळातही अनेकांनी आपलं दु:ख बाजुला सारून मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. अशीच एक घटना अहमदाबादमध्ये देखील घडली आहे.
CoronaVirus News : जिंकलंस मित्रा! कोरोना रुग्णांपर्यंत ऑक्सिजन सिलिंडर पोहचवण्यासाठी करतोय धडपडhttps://t.co/OyNTIRJNSJ#CoronavirusIndia#coronavirus#coronainmaharashtra#MaharashtraFightsCorona#OxygenMan#ShahnawazShaikh
— Lokmat (@MiLOKMAT) April 22, 2021
कडक सॅल्यूट! कोरोनामुळे एकुलता एक मुलगा गमावला; 15 लाखांची FD मोडून दाम्पत्य करतंय रुग्णांची सेवा
कोरोनामुळे एका दाम्पत्याने आपला एकुलता एक मुलगा गमावला आहे. मात्र मुलाच्या मृत्यूनंतर खचून न जाता त्यांनी कोरोनाच्या या महाभयंकर संकटात इतरांचा जीव वाचवण्यासाठी मदतीचा हात दिला आहे. दाम्पत्याने 15 लाखांची एफडी मोडून तो पैसा गरजुंच्या उपचारासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. रसिक मेहता आणि कल्पना मेहता असं या गुजरातच्याअहमदाबादमधील दाम्पत्याचं नाव आहे. रसिक आणि कल्पना या सध्याच्या कोरोनाच्या संकटकाळात गरजुंना आवश्यकत ती सर्व मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.
CoronaVirus Live Updates : Remdesivir च्या नव्या धोरणावरून न्यायालयाने व्यक्त केली नाराजी, म्हणाले...#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#Remdisivir#OxygenShortage#ModiGovt#DelhiHChttps://t.co/D3FPpl3yCGpic.twitter.com/6v09HppgDb
— Lokmat (@MiLOKMAT) April 29, 2021