CoronaVirus Live Updates : ...अन् हसतं-खेळतं घर उद्ध्वस्त झालं! कोरोनामुळे आई-वडिलांचं छत्र हरपलं; 3 मुलं झाली अनाथ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 04:11 PM2021-06-05T16:11:15+5:302021-06-05T16:20:40+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनामुळे आई-वडिलांचं छत्र हरपल्याने तीन मुलं अनाथ झाली आहे. 

CoronaVirus Live Updates corona death parents orphaned three children of same family in ghaziabad | CoronaVirus Live Updates : ...अन् हसतं-खेळतं घर उद्ध्वस्त झालं! कोरोनामुळे आई-वडिलांचं छत्र हरपलं; 3 मुलं झाली अनाथ

CoronaVirus Live Updates : ...अन् हसतं-खेळतं घर उद्ध्वस्त झालं! कोरोनामुळे आई-वडिलांचं छत्र हरपलं; 3 मुलं झाली अनाथ

googlenewsNext

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2,86,94,879 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,20,529 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,380 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,44,082 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाने अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. हसती-खेळती घरं कोरोनामुळे कोलमडून गेली आहेत. घरातील सदस्यांचा अचानक मृत्यू झाल्याने सर्वांनाचा मोठा मानसिक धक्का बसला आहे. कोरोनाच्या संकटात अनेकांनी आपली प्रिय, जवळची व्यक्ती गमावली आहे. अशीच एक मन सुन्न करणारी घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. कोरोनामुळे आई-वडिलांचं छत्र हरपल्याने तीन मुलं अनाथ झाली आहे. 

उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील मोदीनगरमध्ये एक मन हेलावणारी घटना घडली आहे. कोरोनामुळे घरातील कर्त्या मंडळींचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आधी आईचा मृत्यू झाला आणि त्यानंतर वडिलांना देखील जीव गमवावा लागल्याचं मुलांनी म्हटलं आहे. अवघ्या काही महिन्यांत दोघांचाही मृत्यू झाल्याने तीन मुलं आता पोरकी झाली आहेत. मुलीने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे आईचा मृत्यू झाला. त्यानंतर आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वडिलांची तब्येत अचानक बिघडली. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात आलं. मात्र कोणत्याही रुग्णालयाने त्यांना दाखल करून घेतलं नाही आणि याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

आपण शिक्षिका व्हावं अशी आई-वडिलांची इच्छा होती. ती पूर्ण करणार असल्याची माहिती मुलीने दिली आहे. तिच्या दोन्ही लहान भावांची जबाबदारी आता तिच्यावर येऊन पडली आहे. सध्या ही मुलं आपल्या 82 वर्षीय आजोबांसोबत राहत आहेत. मुलांची जबाबदारी कोण घेणार, त्यांचं पुढे कसं होणार? याची चिंता सतावत असल्याचं आजोबांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनाने घरातील कर्ती मंडळी हिरावून नेली असून आता फक्त सासू आणि सून उरल्या असल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. 

कोरोनाने नेली कर्ती मंडळी हिरावून, आता फक्त उरल्या सासू आणि सून

एका महिलेच्या पतीचे कोरोनामुळे निधन झाले. त्यानंतर काही दिवसांची मुलाचा देखील मृत्यू झाला आहे. तीन महिन्यांत कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशमधील पालमपूरच्या समाना गावात ही मन हेलावून टाकणारी घटना घडली. घरातील कर्त्या पुरुषांचं निधन झाल्यानंतर आता फक्त सासू आणि सून राहिल्या आहेत. पती आणि मुलाला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पतीपाठोपाठ मुलगा देखील गमवावा लागल्याने महिलेला मोठा मानसिक धक्का बसला आहे.

https://bit.ly/2RpCMIl

Web Title: CoronaVirus Live Updates corona death parents orphaned three children of same family in ghaziabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.