CoronaVirus Live Updates : कोरोनाचा वेग मंदावला! राज्यांचे निर्बंध हटवण्याची घाई; तज्ज्ञांनी दिला 'हा' इशारा, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 05:35 PM2022-04-01T17:35:29+5:302022-04-01T17:59:35+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना निर्बंध पूर्णपणे हटवणं खूप घाईचं असू शकतं. लोकांनी मास्कचा वापर करावा असं त्यांनी म्हटलं आहे.
नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या चार कोटींच्या वर गेली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,335 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 52 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 5,21,181 लोकांना जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोनाचा वेग मंदावताना पाहायला मिळत आहे. अनेक राज्यांनी कोरोनाचे प्रमाण कमी होत असल्याने निर्बंध पूर्णपणे हटवले असून, दिल्ली आणि महाराष्ट्रात मास्क लावण्याची गरज नाही. याआधी दिल्लीत मास्क घालणे अनिवार्य होते आणि त्याचे उल्लंघन केल्यास पहिला 2000 रुपये आणि नंतर 500 रुपये दंड आकारण्यात आला होता. देशात कोविड-19 प्रकरणांमध्ये सातत्याने घट होत असताना कोरोना निर्बंध शिथील केले जात असताना, तज्ञांनी इशारा दिला आहे.
कोरोना निर्बंध पूर्णपणे हटवणं खूप घाईचं असू शकतं. लोकांनी मास्कचा वापर करावा असं त्यांनी म्हटलं आहे. याच्या मदतीने कोरोना व्हायरस, इन्फ्लूएन्झा आणि स्वाइन फ्लूसारखे इतर संसर्ग टाळता येऊ शकतात. देशातील प्रसिद्ध वायरोलॉजिस्ट टी जेकब जॉन यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील साथीचा रोग संपला असल्याने, SARS-CoV-2 चे संक्रमण कमी करण्यासाठी मास्क वापरण्याची गरज नाही. पण सार्वजनिक ठिकाणी ऐच्छिक मास्क परिधान करण्यास करणं ही चांगली कल्पना आहे. कोरोनाच्या संकटात मास्क अत्यंत प्रभावी ठरत असल्याचं याआधी समोर आलं आहे.
डॉ रविशेखर झा यांनी मास्क घालणे अनिवार्य असले पाहिजे आणि ही सवय कायम ठेवली पाहिजे. कोरोना नियम आणि मास्क पूर्णपणे सोडून देणे योग्य नाही. जगभरात अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आधुनिक जगाने यापूर्वी अशी महामारी पाहिली नव्हती. कोरोना महामारीचे युग विसरता कामा नये. हे खरे आहे की भारतात वेगाने लसीकरण केले गेले आहे, परंतु ही लस संसर्गापासून संरक्षण देत नाही. संसर्ग प्राणघातक असू शकत नाही, परंतु यामुळे अनेक महिने अशक्तपणा येऊ शकतो असं म्हटलं आहे. कोरोनाचं संकट अजून टळलेलं नाही. त्यामुळे निष्काळजीपणा अत्यंत घातक ठरू शकतो.
इंडियन काऊंन्सिल फॉर मेडिकल रिसर्च सेंटर ऑफ एडव्हान्स्ड रिसर्च इन व्हायरोलॉजीचे माजी संचालक जॉन यांनी मास्क घालण्याच्या सवयीमुळे आजार कमी होतील. सध्या किडनी प्रत्यारोपणाचे रुग्ण मास्क घातलेले दिसतात पण मास्क घातल्याने सर्वांनाच फायदा होईल. बस, ट्रेन, विमान इत्यादींमध्ये मास्क घालावे असं म्हटलं आहे. तसेच सर्व रुग्णालयाच्या आवारात, प्रतीक्षालयांमध्ये मास्क घालण्याची सक्रिय जाहिरात व्हायला हवी हे माझे वैयक्तिक मत आहे. कर्मचारी आणि रुग्ण, नातेवाईक, अभ्यागत इत्यादींनी मास्क घालावे असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.