CoronaVirus Live Updates : "रुग्णालयात ऑक्सिजन नाही, माझ्या बाबांचं काय होणार?"; वडिलांच्या काळजीने लेकीची घालमेल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 02:18 PM2021-04-22T14:18:10+5:302021-04-22T14:28:07+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : रुग्णांची वाढती संख्या, बेड्सची आणि ऑक्सिजनची कमतरता सर्वत्र जाणवत आहे. काही रुग्णालयांनी आपल्या रुग्णालयाबाहेर बेड आणि ऑक्सिजन नसल्याचं पोस्टर लावले आहेत.
नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. देशातील रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. गुरुवारी (22 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 3,14,835 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 2,104 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,59,30,965 पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,84,657 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 22,91,428 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,34,54,880 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. याच दरम्यान ऑक्सिजनची मोठी कमतरता भासत आहे.
देशभरातील अनेक रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र रुग्णांची वाढती संख्या, बेड्सची आणि ऑक्सिजनची कमतरता सर्वत्र जाणवत आहे. काही रुग्णालयांनी आपल्या रुग्णालयाबाहेर बेड आणि ऑक्सिजन नसल्याचं पोस्टर लावले आहेत. ऑक्सिजनची कमतरता असल्याने आपल्या रुग्णाला इतर ठिकाणी हलवा असं रुग्णालयाच्या वतीने देखील सांगण्यात आलं आहे. डॉक्टर्सही या गंभीर परिस्थिती पुढे हतबल झाले आहेत. याच दरम्यान एका मुलीच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र याच वेळी ऑक्सिजन पुरवठा नसल्याने वडिलांच्या काळजीने लेकीच्या जीवाची घालमेल होत आहे.
CoronaVirus Live Updates : ...अन् नातेवाईकांवर आली ऑक्सिजन सिलिंडर चोरण्याची वेळ, Video व्हायरलhttps://t.co/2SVeYatIUp#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia#OxygenCylinders#OxygenShortage
— Lokmat (@MiLOKMAT) April 21, 2021
"रुग्णालयात ऑक्सिजन नाही, माझ्या बाबांचं काय होणार?" असं म्हणत मुलीने ऑक्सिजनसाठी मदत मागितली आहे. तर अशा अनेक रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांनाच ऑक्सिजन नसल्याने काही समस्यांचा सामना करावा लागला आहे. ऑक्सिजनचा पुरवठा नसल्याने अनेक रुग्णालयांनी आपल्या रुग्णांना दुसरीकडे शिफ्ट केलं आहे. रुग्णालयातील डॉक्टर हतबल झाले असून डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांना या परिस्थितीची स्पष्ट कल्पना देण्यास सुरुवात केली आहे. ऑक्सिजन नसेल तर उपचार कसे होणार? असा सवाल करत ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची मागणी डॉक्टर प्रशासनाकडे करीत आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
CoronaVirus Mumbai Updates : परिस्थिती गंभीर! "असं मी याआधी कधीच पाहिली नाही... आम्ही खूप हतबल आहोत"; डॉक्टरही भावूकhttps://t.co/wYAtYF7h60#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronain…
अरे देवा! कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांनी चक्क रुग्णालयातून चोरले ऑक्सिजन सिलिंडर; घटनेने खळबळ
कोरोनामुळ अनेक राज्यात भयंकर परिस्थिती निर्माण झाली असून रुग्णांच्या नातेवाईकांवर चक्क आता ऑक्सिजन सिलिंडर चोरण्याची वेळ आली आहे. मध्य प्रदेशच्या दमोहमध्ये ही घटना घडली आहे. नातेवाईक ऑक्सिजन सिलिंडर चोरून घेऊन जात असल्याचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ऑक्सिजन सिलिंडरने भरलेली एक गाडी रुग्णालयाजवळ आली होती. त्याचवेळी रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांनी एक-एक करून सिलिंडर चोरून नेला.
CoronaVirus Live Updates : भय इथले संपत नाही! देशात तब्बल 12,71,00,000 हून अधिक जणांना दिली कोरोना लस https://t.co/8v5izu53mL#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia#HarshVardhan
— Lokmat (@MiLOKMAT) April 21, 2021
देवदूत! कोरोनाग्रस्तांसाठी 'त्याने' घेतला पुढाकार; ऑक्सिजन सिलिंडरसाठी विकली 23 लाखांची कार अन्...राज्यात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून मुंबईतही वेगाने कोरोनाचा संसर्ग होत आहे. अशाच वेळी एका तरुणाने कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. शाहनवाज शेख (Shahnawaz Shaikh) असं या मुंबईच्या तरुणाचं नाव असून तो कोरोनाच्या संकटात लोकांसाठी देवदूत बनला आहे. रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी धडपड करत आहे. विशेश म्हणजे शाहनवाजने लोकांच्या मदतीसाठी स्वत:ची तब्बल 23 लाखांची SUV कार विकली आणि लोकांना ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करुन दिले आहे. यामुळेच तो आता मुंबईत ऑक्सिजन मॅन (Oxygen Man) म्हणून ओळखला जात आहेत.
CoronaVirus News : जिंकलंस मित्रा! कोरोना रुग्णांपर्यंत ऑक्सिजन सिलिंडर पोहचवण्यासाठी करतोय धडपडhttps://t.co/OyNTIRJNSJ#CoronavirusIndia#coronavirus#coronainmaharashtra#MaharashtraFightsCorona#OxygenMan#ShahnawazShaikh
— Lokmat (@MiLOKMAT) April 22, 2021Web Title: CoronaVirus Live Updates corona lucknow hospital oxygen shortage ground report
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.